भगूरमधील घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 16:18 IST2018-01-01T16:14:05+5:302018-01-01T16:18:32+5:30

भगूरमधील घरफोडीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी
ठळक मुद्दे खिडकीचे गज कापलेरोख रकमेसह सोन्याचे दागिने
नाशिक : घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना देवळाली कॅम्पमधील दत्तनगरमध्ये घडली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भगूरच्या दारणा कॅम्परोड परिसरात राजेंद्र पवार राहतात़ २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ते बाहेर गेले असता चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केला़ यानंतर घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले ६० हजार रुपये किमतीचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व २५ हजार रुपये रोख, असा ८५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला़
याप्रकरणी पवार यांच्या फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़