नाशिकमध्ये एकाच दिवशी दोन सोनसाखळी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 22:11 IST2018-03-12T22:11:45+5:302018-03-12T22:11:45+5:30
नाशिक : औरंगाबादरोडवरील एका लॉन्सजवळ हेल्मेट व नाका तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दुचाकीवरील दोघा संशयितांनी दोन महिलांच्या सोनसाखळ्या खेचून नेल्याची घटना सोमवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास घडली़ आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील औरंगाबादरोडवरील लॉन्स परिसरात होत असलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये घबराट पसरली आहे़

नाशिकमध्ये एकाच दिवशी दोन सोनसाखळी चोरी
नाशिक : औरंगाबादरोडवरील एका लॉन्सजवळ हेल्मेट व नाका तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दुचाकीवरील दोघा संशयितांनी दोन महिलांच्या सोनसाखळ्या खेचून नेल्याची घटना सोमवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास घडली़ आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील औरंगाबादरोडवरील लॉन्स परिसरात होत असलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये घबराट पसरली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील पूर्वेश अपार्टमेंटमधील रहिवासी वर्षा अरूण भदाणे (४१) या दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास औरंगाबाद रोडवरील एका लॉन्समध्ये नातेवाइकाच्या विवाह सोहळ्यास गेल्या होत्या़ कारमधून उरतल्यानंतर त्यांचे नातेवाईक वाहनतळावर कार पार्किंगसाठी गेल्यान त्यांची वाट पाहत त्या उभ्या होत्या़ यावेळी नाका-तोंडाला रुमाल बांधलेल्या संशयितांनी भदाणे यांच्या गळ्यातील साडेसहा तोळे वजनाची सोनसाखळी खेचून दुचाकीवरुन पलायन केले़
या घटनेनंतर सायंकाळच्या सुमारास औरंगाबाद रोडवरून जाणाºया एका महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोनसाखळी दुचाकीवरील संशयितांनी खेचून नेल्याची घटना घडली़ या दोन्ही सोनसाखळी चोरीच्या घटनांबाबत रात्री उशिरापर्यंत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़ औरंगाबाद रोडवरवरील लॉन्स परिसरातून दोन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्याने आडगाव पोलिसांच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे.
औरंगाबादरोड की चेनस्नॅचर्स रोड?
आडगाव शिवारातील औरंगाबाद रोडवर मोठ्या संख्येने मंगल कार्यालय व लॉन्स असून या ठिकाणी नेहेमीच विवाह समांरभ होताता़ या परिसरात महिलांच्या सोनसाखळी खेचून नेण्याचे प्रकार यापुर्वीही घडलेले आहेत़ विशेष म्हणजे वारंवार सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असूनही आडगाव पोलिसांना चोरटे सापडलेले नाही तसेच या रोडची ओळख चेनस्नॅचर्स रोड म्हणून होत चालली आहे़