Nashik: A youth was attacked when he entered a house in Satpur in Nashik | नाशकात सातपूरमध्ये घरात घुसून तरुणावर प्राणघातक हल्ला
नाशकात सातपूरमध्ये घरात घुसून तरुणावर प्राणघातक हल्ला

ठळक मुद्देसातपूरमध्ये तरुणावर जीवघेना हल्ला मयूर शिरवानीचा घरात घुसून खुनाचा प्रयत्न पूर्ववैमन्यस्यातून हल्ला झाल्याचा पोलिसांचा अंदाज

नाशिक : सातपूरच्या समर्थनगरमध्ये सोमवारी (दि.१२) एका तरुणावर अज्ञाताने घरात घुसून प्राणघातक हल्ला केल्याने परिसरात दहशत पसरली असून पोलीसांनी या प्रकरणी अज्ञातसंश्यिताविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूरमधील समर्थनगरर येथील मौले हॉलमागील मोहीत अपार्टमेटमधील रहिवासी  मयुर उत्तम शिरवाणी (२२) हे त्याच्या घरात झोपलेला असताना हा हल्ला झाला. हल्ला होण्यापूर्वी मयुर यांच्याच मोहीत अपार्टमेटमधील गणेश नागरे घरातील टीव्ही दुरुस्त करण्यासाठी आला होता.परंतु ५ ते १० मिनिटे प्रयत्न करूनही टिव्ही दुरुस्त न झाल्याने तो पुन्हा निघून गेला. मात्र जाताना त्याने दरवाजा उघडाच ठेवला व मयुर शिरवाणी च्या कुटुंबियांकडूनही घराचा दरवाजा आतून बंद करण्याचा राहून गेला. नेमक्या याच संधीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात इसमांनी रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास शिरवाणीच्या घरात घुसून त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर, गळ््यावर, हनुवटीवर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात मयूर शिरवाणी  गंभीर झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, पूर्व वैमन्यस्यातून हा हल्ला झाला असल्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून  पोलीस उपनिरीक्षक आर. एस. नरोटे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.  


Web Title: Nashik: A youth was attacked when he entered a house in Satpur in Nashik
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.