नाशिकमध्ये तोतया विज कर्मचा-यांनी केली दोन लाखांच्या दागिण्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 19:33 IST2018-02-17T19:28:13+5:302018-02-17T19:33:34+5:30
नाशिक : तुम्ही लाईटबील भरलेले नाही, बिल दाखवा ,घरातील लाईटचे पॉर्इंट दाखवा अशी विचारणा करून घरात घुसलेल्या दोन तोतया वीज मंडळ कर्मचा-यांनी वृद्ध महिलेच्या पावणेदोन लाख रुपये किमतीच्या सहा तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१६) दुपारी नाशिकरोडच्या विद्याविहार कॉलनीत घडली़ विशेष म्हणजे अशा प्रकारे घरात घुसून चोरी केल्याची ही शहरातील तिसरी घटना आहे़

नाशिकमध्ये तोतया विज कर्मचा-यांनी केली दोन लाखांच्या दागिण्यांची चोरी
नाशिक : तुम्ही लाईटबील भरलेले नाही, बिल दाखवा ,घरातील लाईटचे पॉर्इंट दाखवा अशी विचारणा करून घरात घुसलेल्या दोन तोतया वीज मंडळ कर्मचा-यांनी वृद्ध महिलेच्या पावणेदोन लाख रुपये किमतीच्या सहा तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१६) दुपारी नाशिकरोडच्या विद्याविहार कॉलनीत घडली़ विशेष म्हणजे अशा प्रकारे घरात घुसून चोरी केल्याची ही शहरातील तिसरी घटना आहे़
उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विद्याविहार कॉलनी, गुरुद्वाराच्या पाठिमागे अलका नारायण धिवरे (७५) यांचा अरुण विहार बंगला आहे़ शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास धिवरे या घरी एकट्याच होत्या़ त्यावेळी ३५ ते ४० वयोगटातील दोन अनोळखी पुरूष घरी आले व त्यांनी एमएसईबीचे कर्मचारी असल्याची बतावणी करून तुम्ही बिल भरलेले नाही़ तुम्ही भरलेल्या बिलाची पावती दाखवा, तसेच हातातील बांगड्या काढून ठेवा असे सांगितले़ यानंतर धिवरे यांनी त्यांच्या हातातील १ लाख ७७ हजार रुपये किमतीच्या सहा तोळे वजनाच्या सोन्याच्या चार बांगड्या काढून त्या कपाटातील पर्समध्ये ठेवल्या होत्या़
तोतया एमएसईबी कर्मचा-यांपैकी एकजण घरातील लाईटचे पॉर्इंट दाखविण्याच्या नावाखाली वृद्ध महिला धिवरे यांना घराच्या गच्चीवर घेऊन गेला तर खाली असलेल्या दुसºया तोतया कर्मचाºयाने कपाटातील पर्समध्ये ठेवलेल्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या़
या प्रकरणी धिवरे यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात या दोघा तोतयांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसात तीन घटना
पंचवटीतील भक्तीधामजवळील तुलसी श्याम अपार्टमेंट येथील जयश्री दिलीप जोशी (६०) यांच्या घरी गुरुवारी (दि़ १५) दुपारी दोन संशयित मीटर रिडींग घेण्याच्या बहाण्याने घरी गेले़ या ठिकाणी लाईटचे पॉर्इंट पाहण्याच्या बहाण्याने जोशी यांचे ५० हजार रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले़ तर सकाळच्या सुमारास दिंडोरी रोडवरील अमृतकुंभ सोसायटीत राहणा-या नव्वद वर्षीय महिलेस जनगणनेच्या कामासाठी आल्याचे सांगून दोन संशयितांनी घरातील पाऊण लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले़ तर उपनगरची धिवरे यांची या प्रकारची तोतया एमएसईबी कर्मचा-यांनी फसवणूक केल्याची ही तिसरी घटना आहे़