नाशिक : रेल्वे प्रवाशांना ऑपरेशन ब्लेडचा धाक दाखवणाऱ्या चोरट्यांना पोलिसांकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 13:59 IST2023-03-24T13:59:12+5:302023-03-24T13:59:58+5:30
पाच चोरटे ताब्यात

नाशिक : रेल्वे प्रवाशांना ऑपरेशन ब्लेडचा धाक दाखवणाऱ्या चोरट्यांना पोलिसांकडून अटक
अशोक बिदरी
मनमाड ( नाशिक ) : मनमाड - कोपरगाव रेल्वे स्थानकादरम्यान दानापुर - पुणे एक्सप्रेच्या जनरल बोगीमध्ये पाच ते सहा चोरट्यांनी प्रवाश्यांना ऑपरेशन ब्लेडचा धाक दाखवित सहा प्रवाश्यांचे वेगवेगळ्या कंपनीचे १० मोबाईल, रोख रक्कम व सोन्याचे पॅन्डल, चांदीची चैन, ब्रेसलेट, असा दीड लाखांचा मुद्देमाल लुटून पोबारा केला होता. १० मार्च रोजी रात्री सव्वा दहा ते पावणे अकरा वाजेदरम्यान हा प्रकार घडला होता. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
मनमाड लोहमार्ग पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवून शिर्डी येथे सापळा रचून पाच चोरट्यांना शिताफीने अटक करीत त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या मुद्देमलापैकी चांदीची चैन, ब्रेसलेट, पदक, पॅन्डल, वेगवेगळ्या कंपनीचे ८ मोबाईल, रोख रक्कम असा एकुण १ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला.लोहमार्ग पोलीस अधिक तपास करीत आहे.