Nashik Shiv Sena corporator Kalpana Pandey passes away | नाशिक : शिवसेना नगरसेविका कल्पना पांडे यांचे निधन

नाशिक : शिवसेना नगरसेविका कल्पना पांडे यांचे निधन

ठळक मुद्देगेल्या पंधरा वर्षांपासून त्या करत होत्या आपल्या प्रभागाचं नेतृत्वनागरिकांसाठी झटणाऱ्या नगरसेविका म्हणून परिचयाच्या

नाशिक : शिवसेनेच्या सिडको येथील प्रभाग क्रमांक २४ च्या नगरसेविका कल्पना चंद्रकांत पांडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ५० वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

कल्पना पांडे या पंधरा वर्षांपासून त्या सिडकोतील आपल्या प्रभागाचे नेतृत्व करीत होत्या. तर पूर्वी त्यांचे पती चंद्रकांत पांडे यांनीही नगरसेवक पद भूषवले आहे. माजी महापौर विनायक पांडे यांच्या त्या भावजय होत. नागरिकांसाठी सातत्याने उभ्या राहणाऱ्या आणि लढवय्या नगरसेविका म्हणून त्या परिचयाच्या होत्या. अलिकडे स्थायी समितीच्या बैठकीतही सिडकोतील समस्या सोडविण्यासाठी आक्रमक होत्या. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

Web Title: Nashik Shiv Sena corporator Kalpana Pandey passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.