नाशिक हादरलं! प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकरांचं टोकाचं पाऊल; राहत्या घरातच संपवले आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 15:22 IST2026-03-07T15:07:15+5:302026-03-07T15:22:34+5:30
नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी आपल्या राहत्या घरीच टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक हादरलं! प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकरांचं टोकाचं पाऊल; राहत्या घरातच संपवले आयुष्य
नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी आपल्या राहत्या घरीच टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील मनोविकार तज्ञ डॉ. निलेश जेजुरकर यांच्या त्या पत्नी होत्या.गंगापूर रोड परिसरातील डी. के. नगर भागात असणाऱ्या घरातच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत डॉ.मनिषा निलेश जेजुरकर या गंगापूर रोडवरील रेवती ब्ल्यु अपार्टमेंट डी. के. नगर येथे वास्तव्यास होत्या. काल शुक्रवारी रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी खिडकीच्या लोखंडी रॉडला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. या घटनेची माहिती मिळताच त्यांना दुपारी २.४० वाजता उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नसून गंगापूर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. डॉ. मनीषा जेजुरकर या जिल्हा शासकीय रुग्णालयातील मनोविकार तज्ञ डॉ. निलेश जेजुरकर यांच्या त्या पत्नी होत्या.