७-८ वर्षांपूर्वीचे व्हिडिओ अन् १२१ क्लिप्सचा साठा; नोकरीचं आमिष दाखवून महिलांना जाळ्यात ओढायचा रवींद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 14:39 IST2026-04-06T14:27:32+5:302026-04-06T14:39:49+5:30

नाशिकमध्ये अश्लील व्हिडीओंच्या प्रकरणात कथित पत्रकाराला अटक करण्यात आली आहे.

Nashik Scandal 121 Obscene Clips Found; Accused Used Job Baits to Exploit Women | ७-८ वर्षांपूर्वीचे व्हिडिओ अन् १२१ क्लिप्सचा साठा; नोकरीचं आमिष दाखवून महिलांना जाळ्यात ओढायचा रवींद्र

७-८ वर्षांपूर्वीचे व्हिडिओ अन् १२१ क्लिप्सचा साठा; नोकरीचं आमिष दाखवून महिलांना जाळ्यात ओढायचा रवींद्र

Nashik Crime:नाशिकच्या सातपूर परिसरातील अशोकनगरमध्ये राहणाऱ्या एका ६३ वर्षीय कथित पत्रकाराने आणि व्यावसायिकाने महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेत लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रवींद्र गणपत एरंडे असे या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या तांत्रिक पुराव्यांनी पोलीसही चक्रावून गेले आहेत. नोकरीच्या आमिषाने सुरू झालेला हा तपास आता एका मोठ्या सेक्स स्कँडलकडे वळताना दिसत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

संशयित रवींद्र एरंडे याने एका महिलेला तिच्या मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. या बदल्यात त्याने पीडितेचे लैंगिक शोषण केले आणि तिचे अश्लील व्हिडिओ चित्रित केले. या व्हिडिओंच्या जोरावर तो संबंधित महिलेला ब्लॅकमेल करत होता. मात्र, पीडितेने हिंमत दाखवून पोलीस ठाणे गाठत नराधमाचा खरा चेहरा समोर आणला.

तपासातील धक्कादायक खुलासे

पोलिसांनी एरंडेकडून ४ मोबाईल आणि १ टॅब जप्त केला आहे. यामध्ये तब्बल १२१ अश्लील व्हिडिओ क्लिप्स आढळून आल्या आहेत. प्राथमिक तपासात ८ वेगवेगळ्या महिलांची ओळख पटली असून, त्यातील काही व्हिडिओ हे ७ ते ८ वर्षांपूर्वीचे आहेत. इतके जुने व्हिडिओ त्याने का साठवून ठेवले, याचा तपास पोलीस करत आहेत. हे व्हिडिओ केवळ वैयक्तिक वापरासाठी होते की या माध्यमातून तो मध्यमवर्गीय महिलांकडून पैसे उकळत होता किंवा त्यांचे पुन्हा शोषण करत होता? याचा तपास पोलीस करत आहेत.

तक्रारदारांचा आकडा वाढण्याची शक्यता

सध्या एकच महिला समोर आली असली तरी, व्हिडिओंची संख्या पाहता पीडित महिलांची संख्या मोठी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

खंडणीच्या प्रयत्नातून फुटलं भांडं

दरम्यान, या प्रकरणाला एक वेगळी कलाटणी मिळाली ती म्हणजे एरंडेच्याच कार्यालयातील एका कर्मचाऱ्यामुळे. या कर्मचाऱ्याने एरंडेच्या हार्ड डिस्कमधील हे अश्लील व्हिडिओ चोरले होते आणि तेच व्हिडिओ दाखवून त्याने एरंडेकडे १२ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. या वादातूनच अखेर हे संपूर्ण प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले.

पोलिसांनी एरंडेच्या कार्यालयातून महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे ताब्यात घेतले आहेत. जप्त केलेल्या मोबाईलमधील डेटा रिकव्हरीचे काम सुरू आहे. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार असून, तपासासाठी पोलीस त्याची कोठडी वाढवून मागितली जाणार आहे.

Web Title : नौकरी का लालच, अश्लील वीडियो: नासिक में सेक्स स्कैंडल में आदमी गिरफ्तार।

Web Summary : नौकरी का लालच देकर महिलाओं का यौन शोषण करने और अश्लील वीडियो से ब्लैकमेल करने के आरोप में नासिक के रवींद्र एरंडे को गिरफ्तार किया गया। पुलिस ने 121 क्लिप जब्त कीं, जिनमें से कुछ 8 साल पुरानी हैं, जिससे एक बड़े सेक्स स्कैंडल का खुलासा होने की संभावना है। वीडियो पर ब्लैकमेल करने के प्रयास के कारण मामला सामने आया।

Web Title : Job lure, obscene videos: Man arrested in Nashik sex scandal.

Web Summary : A Nashik man, Ravindra Erande, is arrested for sexually exploiting women under the guise of job offers and blackmailing them with obscene videos. Police seized 121 clips, some dating back 8 years, revealing a potential larger sex scandal. A blackmail attempt over the videos led to the exposure.