सेपक टकरा अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकला उपविजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:15 IST2021-09-24T04:15:55+5:302021-09-24T04:15:55+5:30
नाशिक : वर्धा येथे झालेल्या ३१ व्या वरिष्ठ गटाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या ...

सेपक टकरा अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकला उपविजेतेपद
नाशिक : वर्धा येथे झालेल्या ३१ व्या वरिष्ठ गटाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिक जिल्ह्याच्या पुरुष संघाने रौप्य तर महिला संघाने कांस्यपदक पटकावत दुहेरी यश संपादन केले. पुरुष गटात नागपूरने तर महिला गटात नांदेड संघाने विजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात नागपूर विरुद्ध खेळताना नाशिकच्या खेळाडूंनी त्याचं जोमाने खेळ करून नागपूरला निकराची झुंज दिली. तब्बल तीन तास १६ मिनिटे सुरू असलेल्या या अटीतटीच्या रोमांचक लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या सामन्यात नाशिकच्या खेळाडूंनी नागपूरच्या बरोबरीने खेळ करून शेवटपर्यंत चुरस कायम ठेवली. या सामन्याच्या पहिल्या सेटमध्ये नाशिकच्या खेळाडूंना १९/२०, १८/२० आणि दुसऱ्या सेट मध्ये १९/२०, १९/२० अश्या एक गुणांच्या फरकाने पराभव पत्करावा लागला. अखेर नाशिक संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महिला गटातही नाशिकच्या खेळाडूंनी चांगला खेळ करून उपांत्य फेरी गाठली. मात्र या उपांत्य सामन्यात नाशिकला सोलापूर विरुद्ध १८/२१ , १९/२१ १९/२१ , १९/२१ अश्या फरकाने हा सामना ०-२ ने गमवावा लागला आणि तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या अंतिम सामन्यात नांदेड संघाने सोलापूरवर विजय मिळवून पाहिला क्रमांक मिळविला तर सोलापूरला दुसरा क्रमांक मिळाला.