शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोडला सहा प्रभागांत ९२ मतदान केंद्रे सज्ज

By admin | Updated: February 21, 2017 01:14 IST

तयारी पूर्ण : १५00 अधिकरी आणि कर्मचारी नियुक्त; मतदानप्रक्रियेसाठी कडक पोलीस बंदोबस्तात तयारी पूर्ण

नाशिकरोड : मनपा निवडणुकीत नाशिकरोड विभागातील सहा प्रभागांमध्ये ९२ मतदान केंद्रांवर मतदानप्रक्रिया राबविली जाणार असून, याकरिता १५०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. सर्व मतदान केंद्रावर संबंधित अधिकारी, कर्मचारी, मतदान यंत्रे आदि साहित्य सोमवारी सायंकाळपर्यंत रवाना करण्यात येऊन कडक पोलीस बंदोबस्तात मतदानप्रक्रिया राबविण्याची तयारी पूर्ण झाली आहे. मनपा निवडणुकीची सुरू असलेली धामधूम पूर्ण झाली असून, शेवटच्या मतदानप्रक्रियेच्या तयारीसाठी प्रशासन व उमेदवार, कार्यकर्ते कामाला लागलेले होते. निवडणूक शाखेकडून मतदान केंद्र ताब्यात घेण्यात आले असून, त्या ठिकाणी मतदानप्रक्रिया राबविण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सामनगांवरोड शासकीय तंत्रनिकेतनच्या आवारात निवडणूक निर्णय अधिकारी डी. एच. हौसारे यांनी प्रभाग १७, १८ व १९ मधील मतदान केंद्र व खोल्यावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतदानप्रक्रिया राबविण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्यात. यावेळी सर्व मतदान यंत्राची तपासणी करण्यात आली. दुपारनंतर एसटी महामंडळाच्या बसमधून प्रत्येक मतदान केंद्रावर संबंधित अधिकारी, कर्मचारी, मतदान  यंत्रे व इतर साहित्य पोहचविण्यात आले. तसेच दुर्गा उद्यान येथील विभागीय मनपा कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी निर्बळ यांनी मतदानासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतदान प्रक्रिया राबविण्याबाबत मार्गदर्शन केले. प्रत्येक मतदान खोलीला १ खोली प्रमुख, ३ मतदान अधिकारी व एक शिपाई असे ५ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.  तसेच मतदान केंद्रासाठी एक केंद्रप्रमुख व दोन सहायक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. नाशिकरोडच्या सहा प्रभागात मतदानासाठी ९२ मतदान केंद्र व २६३ मतदान खोल्या असून, त्याकरिता १५०० अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. नाशिकरोड विभागात निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून, सर्वांना मतदानाची उत्सुकता लागली आहे. (प्रतिनिधी)