नाशिकरोडला वाहनातून पावणेचार लाखांची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 00:08 IST2019-10-28T00:08:20+5:302019-10-28T00:08:36+5:30
दत्तमंदिर सिग्नलजवळील आर्चिस गॅलरीजवळ झाडाखाली लावलेल्या मारुती इको गाडीची पुढील दरवाजाची काच फोडून अज्ञात चोरट्याने पावणेचार लाखांची रोकड चोरून नेली.

नाशिकरोडला वाहनातून पावणेचार लाखांची रोकड लंपास
नाशिकरोड : दत्तमंदिर सिग्नलजवळील आर्चिस गॅलरीजवळ झाडाखाली लावलेल्या मारुती इको गाडीची पुढील दरवाजाची काच फोडून अज्ञात चोरट्याने पावणेचार लाखांची रोकड चोरून नेली.
सातपूर पपया नर्सरीमागील राजमुद्रा अपार्टमेंटमध्ये राहणारे आयएसपी प्रेस कामगार चंद्रकांत सुधाकर हिंगमिरे यांनी बहिणीच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता पंजाब नॅशनल बॅँकेच्या खात्यातून चार लाख रुपये काढले. त्यातील २० हजार रुपये हिंगमिरे यांनी स्वत:च्या खिशात ठेवून ३ लाख ८० हजार रुपयांची रोकड कापडी पिशवीत ठेवून त्यांच्या मारुती इको (एमएच १५ सीएम ९५३६) हिच्या चालकाशेजारील शिटवर ठेवली. तेथून हिंगमिरे हे पवन हॉटेलजवळील एका बॅँकेत दहा-दहा रुपयांचे सुट्टे घेण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना सुट्टे पैसे मिळू शकले नाही. तेथुन हिंगमिरे हे जेलरोड व जयभवानीरोड येथे कामाकरिता गेले होते.
दुपारी साडेतीनच्या सुमारास हिंगमिरे यांनी दत्तमंदिर सिग्नलजवळील आर्चिस गॅलरीसमोरील झाडाखाली मारूती इको गाडी लावून समोरच बिझनेस बॅँकेत सुट्टे आणण्यासाठी गेले. काही वेळात सुट्टे पैसे घेऊन हिंगमिरे पुन्हा आपल्या गाडीकडे आले असता त्यांना चालकाशेजारील दरवाजाची काच फोडून शिटवर कापडी पिशवी ठेवलेली ३ लाख ८० हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.