नाशिकरोडला दोघांना मारहाण

By Admin | Updated: December 20, 2015 22:50 IST2015-12-20T22:48:29+5:302015-12-20T22:50:24+5:30

नाशिकरोडला दोघांना मारहाण

Nashik Road to beat both | नाशिकरोडला दोघांना मारहाण

नाशिकरोडला दोघांना मारहाण

नाशिकरोड : कोथिंबिरीच्या जुडीचा भाव कमी करत नसल्याच्या कारणावरून संसरी येथील शेतकरी पिता-पुत्राला काही स्थानिक भरणेकरूंनी मारहाण केल्याची घटना घडली असून, याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात परस्पर तक्रार देण्यात आली.
संसरी येथील शेतकरी बाळू त्र्यंबक पाळदे व त्यांचा मुलगा रोहन हे नाशिकरोड येथील उड्डाणपुलाखाली शेतातील काही कोथिंबिरीच्या जुड्या विक्रीसाठी आले होते. दरम्यान उड्डाणपुलाखालील काही स्थानिक भरणेकरूंनी त्यांना भाव कमी करण्यासाठी वाद घातला. मात्र परवडत नसल्याने त्यांनी संबंधिताना ठाम नकार दिला असता काहींनी त्यांना या ठिकाणी विक्री करण्यास मज्जाव केला. त्यामुळे वाद वाढत गेला. अशातच एका महिलेला पुढे करून काही गुंडप्रवृत्तीच्या युवकांनी पाळदे पिता-पुत्रास मारहाण केली. तर यावेळी काहींनी मध्यस्ती केली असता त्यांनादेखील युवकांनी मारहाण केली. नाशिकरोड पोलीस ठाण्यासमोरच हा प्रकार घडल्याने पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी धाव घेत युवकांना ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Nashik Road to beat both