शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांनी घेतला किल्ले जीवधनच्या संवर्धनाचा ध्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 00:37 IST

जानोरी : नाशिकच्या स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेने जुन्नर तालुक्यातील किल्ले जीवधनच्या कल्याण दरवाजा पायरी मार्गाच्या संवर्धनाचा ध्यास घेतला असून, ...

ठळक मुद्देस्वराज्य संवर्धन बहुद्देशीय संस्थेचा उपक्रम

जानोरी : नाशिकच्या स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेने जुन्नर तालुक्यातील किल्ले जीवधनच्या कल्याण दरवाजा पायरी मार्गाच्या संवर्धनाचा ध्यास घेतला असून, पर्यटकांकडून संस्थेच्या स्वयंसेवकांच्या कामाचे कौतुक केले जात आहे.किल्ले जीवधनच्या कल्याण दरवाजाच्या वरचा पायरी मार्ग ब्रिटिश काळात सुरुंग लावून फोडण्यात आला होता व तो मोठमोठ्या दगडांनी गाडला गेला होता. स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेच्या स्वयंसेवकांकडून ते दगड फोडून मोकळा करण्यासाठी सुरुवात केली. विशेष म्हणजे रात्री १२ वाजता नाणेघाट येथे मुक्काम करून सकाळी किल्ल्यावरील सात पाय-ऱ्यांवरील मोठमोठे दगड फोडून व ते दगड किल्यावर संवर्धित केले. २२० किलोमीटरचा प्रवास करुन आलेल्या स्वयंसेवकांचे संवर्धन कार्य पाहून त्याठिकाणी येणार्‍या पर्यटकांनी संस्थेचे कौतुक केले. संवर्धनासाठी प्रवीण भेरे, भाऊसाहेब चव्हाणके, भाऊसाहेब कुमावत, सजन फलाने, नितीन ठाकरे, मयूर घुले, पंकज ठाकरे, प्रवीण घोलप , आशिष घोलप, नितीन देशमुख, करण कानडे, शुभम मेधने, समाधान जाधव, अमोल शिरसाठ, अक्षय उगले, गौरव पाटील, प्रशांत देशमुख, वैभव झनकर, नीलेश शिंदे, साईराज जाधव, बापू गांगुर्डे यांनी योगदान दिले. पस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी ट्रेलचे विश्वस्त विनायक खोत, विजय कोल्हे, प्रशांत केदारी व रमेश खरमाळे यांनी संवर्धन कार्यात सहभागी होऊन मार्गदर्शन केले. येणाऱ्या काळात शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य संपूर्ण पायरी मार्ग मोकळा करणार असून किल्ले संवर्धन व जतनाचा संदेश ते तरुणांना याच माध्यमातून देणार आहेत.

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासSocialसामाजिक