Nashik Oxygen Leakage : नाशिकमधील दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त करत आदित्य ठाकरे यांनी केली मोठी घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 03:44 PM2021-04-21T15:44:21+5:302021-04-21T15:47:00+5:30

Nashik Oxygen Leakage News : नाशिकमधील घटनेमुळे आधीच कोरोनाच्या संकटामुळे चिंतीत असलेल्या राज्यामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिकमधील या घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे

Nashik Oxygen Leakage: Expressing grief over the accident in Nashik, Aditya Thackeray made a big announcement |  Nashik Oxygen Leakage : नाशिकमधील दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त करत आदित्य ठाकरे यांनी केली मोठी घोषणा 

 Nashik Oxygen Leakage : नाशिकमधील दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त करत आदित्य ठाकरे यांनी केली मोठी घोषणा 

Next

नाशिक - नाशिकमध्ये रुग्णालयाला प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या ऑक्सिजन टँकमधून झालेल्या गळतीमुळे मोठी दुर्घटना होऊन २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Nashik Oxygen Leakage News ) या घटनेमुळे आधीच कोरोनाच्या संकटामुळे चिंतीत असलेल्या राज्यामध्ये खळबळ उडाली आहे. (Coronavirus in Maharashtra ) दरम्यान, राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी नाशिकमधील या घटनेबाबत तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली आहे. (Expressing grief over the accident in Nashik, Aditya Thackeray made a big announcement)

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले की, नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही सगळेच या सर्व कुटुंबांच्या दु:खात सहभागी आहोत. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि सर्व अधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या संपर्कात आहेत. ह्या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी केली जाईल, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या टाकीला दुपारी १२ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली. त्यामुळे टाकीमधून ऑक्सिजन वाया जात असल्याचं चित्र दिसून येत आहे. गळती बंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. परंतु ऑक्सिजन गळतीमुळे तब्बल २२ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला, आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली.   

Web Title: Nashik Oxygen Leakage: Expressing grief over the accident in Nashik, Aditya Thackeray made a big announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.