Nashik Oxygen Leak: ऑक्सिजन टाकीला नवा कॉक बसवण्यात येत होता, इतक्यात...; वाचा, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात कशी घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 03:37 PM2021-04-21T15:37:04+5:302021-04-21T15:37:55+5:30

Nashik oxygen tank leak live updates, 22 patients die due to low oxygen supply at Zakir Hussain hospital: झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये आज सकाळच्या सुमारास मोठ्या ऑक्सिजन टाकीचा कॉक नांदुरुस्त असल्याने त्यातून गळती सुरू झाली.

Nashik Oxygen Leak: How the accident happened at Dr Zakir Hussain Hospital | Nashik Oxygen Leak: ऑक्सिजन टाकीला नवा कॉक बसवण्यात येत होता, इतक्यात...; वाचा, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात कशी घडली दुर्घटना

Nashik Oxygen Leak: ऑक्सिजन टाकीला नवा कॉक बसवण्यात येत होता, इतक्यात...; वाचा, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात कशी घडली दुर्घटना

googlenewsNext

नाशिक – शहरातील मनपाचं डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यामुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. याठिकाणी ऑक्सिजनच्या टाकीमधून गळती होऊ लागल्याने व्हेंटिलेटरवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची प्रकृती अचानक खालावली. या दुर्घटनेतील जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्याचसोबत या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये आज सकाळच्या सुमारास मोठ्या ऑक्सिजन टाकीचा कॉक नांदुरुस्त असल्याने त्यातून गळती सुरू झाली. ही गळती रोखण्यासाठी जेव्हा तंत्रज्ञ कारागीर दाखल झाले त्यावेळेस दुरुस्तीचे काम सुरू असताना ऑक्सिजन टाकीचा नादुरुस्त असलेला कॉक पूर्णपणे तुटला. नवीन कॉक बसवून गळती थांबविण्यासाठी २ तासांचा कालावधी लोटला. तोपर्यंत ऑक्सिजन टाकी रिकामी झाली होती. दुपारी २ वाजता पर्यायी टॅंकर पुरविला गेला त्याद्वारे टाकी भरण्यात आली.  

नाशिकमध्ये हाहाकार! ऑक्सिजन गळतीमुळं २२ रुग्णांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

या २ तासाच्या कालावधीत हॉस्पिटलमधील ऑक्सिजन पुरवठाचा दाब पूर्णपणे कमी झाला. त्यामुळे व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण हे एका पाठोपाठ दगावण्यास सुरुवात झाली. तब्बल २२ रुग्ण या दुर्घटनेत दगावल्याची माहिती जिल्हा अधिकारी सुरज मांढरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. या दुर्दैवी घटनेची संपूर्णपणे चौकशी केली जाईल आणि दोषी असणार्‍यांवर कारवाई करणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. महापालिका आयुक्त कैलास जाधव रुग्णालयात येईपर्यंत सर्वत्र हाहाकार उडालेला होता. नातेवाईकांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश आपले अत्यवस्थ झालेले रुग्ण वाचविण्यासाठी सुरू असलेली सर्वांची धावपळ कोणी ऑक्सिजन सिलेंडर घेऊन होते तर कोणी स्ट्रेचरवर आपले नातेवाईक बाहेर आणून रुग्णवाहिकेतून दुसऱ्या दवाखान्यांमध्ये देण्याची कसरत करत आहे. हे सगळे भयानक आणि मानवी हृदयाला पिळवटून टाकणारे दृश्य नाशिकच्या मनपा डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयाच्या आवारात पाहायला मिळालं.

ऑक्सिजन गळतीनंतर धावाधाव, पाहा डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील फोटो

एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा आणि दुसरीकडे या सगळ्यात गडबडीमुळे या दुर्घटनेमुळे २२ रुग्णांना आपले प्राण मुकावे लागले आहेत त्यांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला तो आक्रोश हा बेजबाबदार व्यवस्थेला हादरवून सोडणारा नक्कीच ठरेल आणि यापुढे अशी एक दुर्घटना राज्यामध्ये कुठेही घडणार नाही यासाठी प्रशासन तेवढी सतर्कता आणि तेवढी खबरदारी घेईल या दुर्घटनेतून अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Nashik Oxygen Leak: How the accident happened at Dr Zakir Hussain Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.