शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Nashik Oxygen Leak: नाशिकमध्ये हाहाकार! ऑक्सिजन गळतीमुळं २२ रुग्णांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 2:18 PM

Coronavirus, Oxygen leakage from tanker creates panic at Nashik hospital: हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. १० ते ११ रुग्ण मृत्यू पडल्याची शक्यता असल्याचं महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं

नाशिक – एकीकडे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असताना दुसरीकडे नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या टाकीला दुपारी १२ च्या सुमारास मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली. त्यामुळे टाकीमधून ऑक्सिजन वाया जात असल्याचं चित्र दिसून येत आहे. गळती बंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. परंतु ऑक्सिजन गळतीमुळे तब्बल २२ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. 

तब्बल २ तासानंतर नाशिक महापालिका आयुक्तांनी रुग्णालयस्थळी भेट दिली. ऑक्सिजन गळती प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. १० ते ११ रुग्ण मृत्यू पडल्याची शक्यता असल्याचं महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं होतं. तर शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांनी रुग्णालयाला भेट दिली त्यानंतर या घटनेमुळे ३०-३५ रुग्ण दगावल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

हॉस्पिटलमध्ये साधारणपणे १५० रुग्ण आहेत. ऑक्सिजन गळती होत असल्याने रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा हळूहळू संपत चालला आहे. त्यामुळे आणखी रुग्ण दगावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ऑक्सिजन गळती रोखण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. या दुर्घटनेत १०-११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असली तरी आणखी रुग्ण दगावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ऑक्सिजन नसल्याने रुग्णांची प्रकृती खालावत चालली आहे.

महापालिकेचे हे संपूर्ण कोविड रुग्णालय आहे. अनेक रुग्ण ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटरवर आहेत. ऑक्सिजन टाकीला गळती लागल्याने अशा रुग्णांचा जीव धोक्यात आला असून त्यांना अन्य ऑक्सिजन असलेल्या रुग्णालयात स्थलांतरीत  करण्यात येत आहे. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून तातडीने १५ जम्बो ऑक्सिजन सिलिंडर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी झाकीर हुसेन रूग्णालयात पाठविण्यात येत आहे. १० के एलची टाकी आहे. १५-२०  दिवसांपूर्वीच टाकी बसविली होती. नाशिक महापालिकेने न्यू बिटको आणि झाकीर हुसेन रुग्णालयात ठेकेदारामार्फत भाड्याच्या टाक्या बसविल्या आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याNashik Oxygen Leakageनाशिक ऑक्सिजन गळती