नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 15:49 IST2025-05-16T15:33:45+5:302025-05-16T15:49:45+5:30

Nashik Latest News: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपामुळे शिवसेनेला काही जागा सोडाव्या लागल्या होत्या. भाजपचा सध्याचा मूड बघता नाशिकमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याची वेळ आली, तर त्या दृष्टीने तयारी करण्याचे संकेत या बैठकीत देण्यात आले.

Nashik Municipal Election: Shinde's Shiv Sena prepares to contest on its own in the grand alliance, Shrikant Shinde will tour | नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा

नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा

Nashik Municipal Corporation Election News: गेल्या दोन दिवसांपासून शिंदेसेनेत धुसफूस असली तर गुरुवारी (दि.१५) सर्व वाद प्रवाद दूर होऊन मुंबई येथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी संघटनाच नव्हे तर निवडणुकांमधील इच्छुकांबाबतही चर्चा करण्यात आली. सध्याचा भाजपाचा मूड बघता नाशिकमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याची वेळ आली तर त्या दृष्टीने तयारी करण्याचे संकेतही या बैठकीत देण्यात आले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मुंबई येथे पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, राम रेपाळे यांच्यासह अन्य पदाधिकारी तसेच नाशिकमधील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तालुकानिहाय तसेच नाशिक शहरातील पूर्व, पश्चिम, मध्य तसेच देवळाली मतदारसंघातील सर्व शाखाप्रमुख, आघाडीप्रमुख, युवती सेना, महिला आघाडी अशा सर्व पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली. यावेळी संघटनेची माहिती घेतानाच पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

शिवसेनेच्या बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

कोणत्या प्रभागात कोण इच्छुक आहेत, तसेच कोणत्या मतदारसंघात संघटनेतील सर्व पदे भरलेली नाहीत अशा सर्वच प्रकारच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी काळात संघटन अधिक मजबूत करणे आणि शिंदेसेनेला यशस्वी करण्यासाठी राज्य सरकारचे आणि पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोकहिताचे निर्णय मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

वाचा >>"मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

प्रत्येक प्रभागात पाच ते दहा हजार सभासद करण्यासाठी फॉर्मदेखील भरून घेण्याचे यावेळी ठरवण्यात आले. बैठकीला नाशिक लोकसभा संपर्कप्रमुख जयंत साठे, पक्षाचे सचिव संजय मोरे, उपनेते विजय बोरस्ते, विजय करंजकर, राजू लवटे, माजी खासदार हेमंत गोडसे, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पक्षाचे नूतन सचिव राम रेपाळे यांच्या सत्कार सोहळ्यास एक गट अनुपस्थित होता. तसेच त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे नेते खासदार एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन गटबाजीविषयी तक्रारी केल्या होत्या. गुरुवारी (दि. १५) मात्र, सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

२४ मे रोजी नाशिक दौऱ्यात होणार बैठका

खासदार श्रीकांत शिंदे येत्या २४ मे रोजी नाशिकच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत अनेक ठिकाणी उद्घाटन व अन्य कार्यक्रम होणार आहेत. संघटनात्मक बैठकदेखील यावेळी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Nashik Municipal Election: Shinde's Shiv Sena prepares to contest on its own in the grand alliance, Shrikant Shinde will tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.