शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Nashik Municipal Election 2026 : उद्धवसेनेची अस्तित्वासाठी लढाई; नावालाच आघाडी, मैत्री मनसेशीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 16:36 IST

Nashik Municipal Election 2026 : उद्धवसेनेचे २५ हून अधिक माजी नगरसेवक, कार्यकर्ते शिंदेसेनेत गेल्याने मनपा निवडणुकीत उद्धवसेनेचे प्रयत्न आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी होत असून त्यांनी मनसेला सोबत घेतल्याने काहीसे बळ मिळाले आहे.

नाशिक : उद्धवसेनेचे २५ हून अधिक माजी नगरसेवक, कार्यकर्ते शिंदेसेनेत गेल्याने मनपा निवडणुकीत उद्धवसेनेचे प्रयत्न आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी होत असून त्यांनी मनसेला सोबत घेतल्याने काहीसे बळ मिळाले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्याशी त्यांनी मैत्री कायम ठेवली आहे. मात्र जवळपास ११ ठिकाणी काँग्रेसने देखील उमेदवार दिल्याने उद्धव सेनेची कोंडी झाली तर उद्धवसेनेने देखील काही ठिकाणी उमेदवार दिल्याने आघाडीत बिघाडी निर्माण झाली. अखेरच्या क्षणी उद्धवसेनेने आपले उमेदवार ८२ ठिकाणी उभे केले आहेत.

प्रारंभी येथे उद्धवसेना व मनसेची युती निश्चित होती. परंतु नंतर राष्ट्रवादी (शरद पवार) व काँग्रेसने उद्ध‌वसेनेसमोर सोबत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र उद्धवसेनेने अधिक जागा देण्यास दोघा पक्षांना नकार दिला. त्यामुळे अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत कुठल्या जागा कोणासाठी यावरून चर्चा लांबली अन् बघता बघता तब्बल ८२ ठिकाणी पक्षाने एबी फॉर्म देऊन आपले उमेदवार निश्चित केले. त्यामुळे महाआघाडीत बिघाडी झाली. अन् उद्धवसेना अन् मनसे राष्ट्रवादी (शरद पवार) अन् काँग्रेससोबत केवळ नावापुरता सोबत राहिली आहे.

अखंड शिवसेना दुभंगल्यानंतर सुधाकर बडगुजर यांच्यासह अनेक मावळे पक्ष सोडून शिंदेसेना व भाजपात दाखल झाले. त्यामुळे पक्षाला तडे गेले. त्यातव निवडणूक तोंडावर असताना माजी महापौर विनायक पांडे अन् नितीन भोसले यांनी भाजपाचे कमळ हाती घेतले. त्यामुळेच उरलेल्या निष्ठावान शिवसैनिकांना सोबत घेऊन उद्धवसेनेची या निवडणुकीत अस्तित्वाची लढाई आहे. कधीकाळी नाशिक म्हणजे ठाकरेंचा बालेकिल्ला अशी ओळख राज्यभर होती. परंतु यंदाची निवडणूक पक्षासाठी आव्हानात्मक ठरत आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळाले होते. यशाचा तोच आलेख कायम राखण्याचे आव्हान पक्षासमोर मनपा निवडणुकीत आहे.

मनसे वगळता दोघे मित्रपक्षांना ठेवले लांबच

नाशिकमध्ये महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढत असलेले काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार) यांना उद्धव व राज ठाकरे यांच्या संयुक्त सभेपासून लांब ठेवण्यात आले. दोघा पक्षांचे नेते सभेला नव्हते. सभेत झेंडेदेखील मनसे, उद्धवसेनेचेच होते. सभेत ठाकरे बंधूंनी भाजपसह शिंदेसेनेवर टीकास्त्र सोडले. ही एकच सभा दोन पक्षांची झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Sena's fight for survival; alliance in name only, friendship with MNS.

Web Summary : Uddhav Sena struggles for Nashik survival after defections. Alliance with Congress, NCP strained. Leaning on MNS, Uddhav Sena contests 82 seats, facing a tough election to retain its stronghold legacy.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Nashik Municipal Corporation Electionनाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाPoliticsराजकारणNashikनाशिकShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसे