नाशिक - भाजपने नाशिकमध्ये अनेक पक्षाचे लोक फोडून त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपच्या दोन्ही महिला आमदार नाराज झाल्या. तेथे तिकिटासाठी संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याचे काय? आमचे एबी फॉर्म हे काही चालत्या गाडीत किंवा फार्म हाऊसवर दिले गेले नाही तर पक्ष कार्यालयातून दिले गेले, असा उपरोधिक टोला उद्धवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
उद्धवसेनेतून अनेक लोक पक्ष सोडून गेले, परंतु त्याने काही फरक पडत नाही. एक दिवस आमचाही परत येईल. तपोवन वृक्षतोडीला आमचा विरोधच आहे. साताऱ्याला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरही तपोवनातील वृक्षतोडीला विरोध झाला. याचा विचार मुख्यमंत्री, कुंभमेळा मंत्र्यांनी करावा, असे सांगुन सावंत म्हणाले की, देशभरात पक्षांतर बंदी कायद्याची पायमल्ली होत आहे. मनासारखे घडले नाहीतर पक्ष बदल केला जातो. त्याहीपेक्षा महत्त्वाचे विरोधकांना खिळखिळे करण्यासाठी त्यांचे लोक आपल्या पक्षात ओढण्यासाठी सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून धमक्या दिल्या जातात. त्यामुळे लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. असे सांगुन सत्ता आणणे अन् मलिदा चाखणे, हेच काम भाजपचे आहे. मात्र, नाशिक मनपा निवडणुकीत त्याचे उत्तर मतदार देतील. असे ते म्हणाले, भाजपने नाशिकची धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय परंपरा मोडीत काढली आहे.
सत्ताधारी युतीचे जिल्ह्यात १३ आमदार व तीन मंत्री असताना पालकमंत्री देऊ शकत नाही. कुंभमेळा मंत्रीही बाहेरून आणावा लागतो, याचा विचार शहरवासीयांनी करावा, नाशिक शहर भाजपमुक्त करायचे आहे, असे ते म्हणाले. ९ जानेवारीला शहरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांची संयुक्त सभा होणार असल्याचे त्यांनी सांगितले
नाशिकची जबाबदारी सावंत यांच्याकडे
नाशिकची उद्धवसेनेची जबाबदारी खासदार संजय राऊत यांच्याकडे होती. मात्र प्रकृतीमुळे ते येथे सध्या येऊ शकत नाही. त्यामुळे मी आज सभेची तयारी तसेच एकूणच आढावा घेण्यासाठी आलो असल्याचे सावंत म्हणाले. अर्थात सावंत यांच्याकडे जबाबदारी दिल्यानंतर ते मंगळवारी (दि. ६) दाखल झाले असले तरी पक्षाची उमेदवारी निश्चिती होऊन गेली आहे.
.
Web Summary : Arvind Sawant criticized BJP for importing leaders, causing discontent among its own MLAs and workers in Nashik. He accused BJP of undermining democracy and prioritizing power over principles, predicting voter backlash in upcoming elections.
Web Summary : अरविंद सावंत ने भाजपा पर नेताओं को आयात करने का आरोप लगाया, जिससे नाशिक में उसके अपने विधायक और कार्यकर्ता असंतुष्ट हैं। उन्होंने भाजपा पर लोकतंत्र को कमजोर करने और सिद्धांतों पर सत्ता को प्राथमिकता देने का आरोप लगाया, आगामी चुनावों में मतदाता प्रतिक्रिया की भविष्यवाणी की।