शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन निवडणुकीत मनसेला मुंबईत मोठा धक्का; माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपाच्या वाटेवर
2
Video: विलासरावांच्या आठवणी लातूर शहरातून पुसल्या जातील; रवींद्र चव्हाणांच्या विधानानं वाद
3
मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश; रक्ताने पत्र लिहून इच्छामरणाची मागणी
4
खुला प्रवर्ग कुणासाठी राखीव नाही, सरकारी नोकरीत निवड मेरिटवर व्हावी; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
5
उल्हासनगरमध्ये अर्धे उमेदवार कोट्यधीश! ९३ कोटींचे मालक भाजपाकडे तर ५७ कोटींचे धनी शिंदेसेनेकडे
6
"तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून ते आता ड्रग्जची पुडी देतील"; तानाजी सावंतांचा भाजपासह पाटलांवर टीकास्त्र
7
निवडणूक आयोगाचा अजब कारभार, उमेदवाराचा AB फॉर्म गहाळ; अधिकाऱ्याला बसला फटका
8
'मी कधीच पक्षाच्या विचारधारेपासून दूर गेलो नाही', PM मोदी अन् अडवाणींच्या कौतुकावर थरुर म्हणाले...
9
रेल्वे रुळांना वर्षानुवर्षे गंज का लागत नाही? तुम्हाला माहितेय का? त्यामागं दडलंय खास कारण!
10
सूचकाच्या अर्जावरून अपक्षाचा अर्ज मागे घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड, ठाण्यात काय घडलं?
11
"मी धनूभाऊंना परळी देऊन टाकली!" पंकजा मुंडेंचे विधान चर्चेत, भावंडांच्या नात्यात नवा अध्याय!
12
बँकेच्या लॉकरमधून २६ तोळे सोनं काढलं, चुकून दुसऱ्याच्या डिक्कीत ठेवलं, पुढं असं घडलं की...
13
आई, भाऊ आणि बहिणीची हत्या करून पोलीस ठाण्यात गेला, म्हणाला...; तिहेरी हत्याकांडाने दिल्ली हादरली
14
"अंबरनाथ, बदलापूरमधून आम्ही तुम्हाला हाकलून दिले, उल्हासनगरमध्ये धनुष्यबाणाचा सुपडासाफ करु"
15
तुम्ही देवालाही सोडलं नाही, सबरीमाला सोने चोरी प्रकरणी याचिकाकर्त्यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले
16
सारा तेंडुलकरने पापाराझीला पाहून पटकन तोंड का लपवलं? VIRAL VIDEO मुळे इंटरनेटवर रंगली चर्चा
17
राजकारणातून निवृत्तीच्या चर्चांवर खुद्द नारायण राणेंचे उत्तर, म्हणाले- "जर माझ्या पदाचा..."
18
‘मी माझ्या आई, बहीण, भावाला ठार मारलंय’, तिघांचा खून करून पोलीस ठाण्यात आला तरुण
19
एक्स बॉयफ्रेंड, थर्टी फर्स्टची भेट अन् घरात मिळाला मृतदेह; अमेरिकेत हत्या झालेली निकिता कोण?
20
भाग्यवान! पिठाची गिरणी चालवणाऱ्याचं एका क्षणात फळफळलं नशीब, 'असा' झाला करोडपती
Daily Top 2Weekly Top 5

Dada Bhuse : "भाजपनेच युतीच्या चर्चेचे दार बंद केले, नाशिक मनपावर शिंदेसेनेचाच भगवा फडकेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:38 IST

Nashik Municipal Election 2026 And Dada Bhuse : नाशिक मनपावर शिंदेसेनेचाच भगवा फडकेल, असा टोला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी भाजपला नाव न घेता पत्रकारांशी बोलताना लगावला.

मनपा निवडणुकीत भाजपसोबत युतीसाठी चर्चेचे दार आम्ही खुले ठेवले होते. भाजप नेत्यांशी चर्चादेखील चालली होती. जागा वाटपाचे नियोजनही होत होते; परंतु त्यांनीच नंतर युतीचे द्वार बंद केले. सत्तेत येण्याच्या कोणाला कितीही वल्गना करू द्या. नाशिक मनपावर शिंदेसेनेचाच भगवा फडकेल, असा टोला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी भाजपला नाव न घेता पत्रकारांशी बोलताना लगावला.

माजी खासदार हेमंत गोडसे यांनी त्र्यंबकेश्वरच्या निकालाची पुनरावृत्ती नाशिकमध्ये होणार असल्याचे सांगून भाजपलाच आव्हान दिले. १२ जानेवारीला एकनाथ शिंदे यांची शहरात प्रचार सभा होणार असल्याचे भुसे म्हणाले. उद्योगमंत्री उदय सामंत, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांच्याही सभा होणार असल्याचे भुसे म्हणाले.

नाशिकच्या विकासाचे व्हिजन घेऊन आम्ही जनतेत जात आहोत. उमेदवारी देताना वशिलेबाजी झाली, आर्थिक व्यवहाराचाही आरोप होत आहे? या प्रश्नावर दादा भुसे म्हणाले की, उमेदवारीसाठी कार्यकर्ते जास्त इच्छुक असतात. त्यातून मार्ग काढावा लागतो. निवडणूक आली की, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, असा खोटा प्रचार उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जातो. युतीचे अनेक नगरसेवक बिनविरोध आल्यानंतर विरोधकांकडून चुकीचा प्रचार केला जात असल्याचे भुसे म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Closed Alliance Door; Shinde Sena's Flag Will Fly in Nashik.

Web Summary : Dada Bhuse criticized BJP for ending alliance talks for Nashik Municipal Corporation. Shinde Sena aims to win, echoing Trimbakeshwar results. Eknath Shinde will hold a rally on January 12. Bhuse refuted claims of unfair candidate selection.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Nashik Municipal Corporation Electionनाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६Dada BhuseDada BhuseBJPभाजपाPoliticsराजकारणNashikनाशिकShiv SenaशिवसेनाHemant Godseहेमंत गोडसे