शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
2
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
3
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
4
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
5
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
6
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
7
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
8
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
9
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
10
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
11
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
12
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
13
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
14
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
15
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
16
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
17
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
18
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
19
"अजित पवारांनी २५ वर्षे ही माहिती का दडवली?", ३१०  कोटींच्या प्रकल्पावरून एकनाथ खडसे यांनी घेरले, गंभीर मुद्द्यांवर बोट
20
मकरसंक्रांतीच्या दिवशीच दुर्दैवी घटना; चायनीज मांजाने गळा कापल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Nashik Municipal Election 2026 : प्रचारासाठी ४५१ उमेदवारांनी केला १ कोटी ३५ लाख रुपयांचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 15:29 IST

Nashik Municipal Election 2026 : निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रत्येक उमेदवाराला प्रचारासाठी होणाऱ्या खर्चाची दैनंदिन नोंद ठेवणे आवश्यक आहे.

नाशिक : महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाल्यापासूनच उमेदवारांनी प्रचारासाठी खर्च करण्यास सुरुवात केली असून, त्याचा जमा खर्च सादर करण्यासाठी मात्र अद्यापही पूर्ण प्रतिसाद मिळालेला नाही. ७३५ उमेदवारांपैकी ४५१ उमेद‌वारांनी आपला खर्च महापालिकेचे खर्च निरीक्षक आणि मतदान अधिकाऱ्यांकडे सादर केला असून, दि. १२ जानेवारीपर्यंत १ कोटी ३५ लाख ४९ हजार ९३५ रुपयांचा खर्च नोंदविण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, प्रत्येक उमेदवाराला प्रचारासाठी होणाऱ्या खर्चाची दैनंदिन नोंद ठेवणे आवश्यक आहे. जाहिराती, सभा, मिरवणुका, बॅनर, पोस्टर, वाहन वापर, सोशल मीडियावरील प्रचार, तसेच कार्यकर्त्यावरील खर्च यांचा तपशील खर्च नोंदणीवहीत नमूद करणे बंधनकारक आहे. निवडणूक झाल्यानंतर तीस दिवसांच्या मुदतीत हा खर्च सादर करणे आवश्यक आहे. तो सादर न केल्यास उमेदवाराला सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घातली जाते.

उमेदवारांनी खर्च नोंदणी वही वेळोवेळी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी किंवा नेमून दिलेल्या खर्च निरीक्षकांसमोर तपासणीसाठी सादर करावी लागणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठराविक अंतिम मुदतीत खर्चाचा अंतिम अहवाल सादर करणे अनिवार्य असून, मुदत चुकल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास संबंधित उमेदवारावर कारवाई होऊ शकते.

खर्चाची मर्यादा ओलांडल्यास, खर्च लपविल्यास किंवा नियमांचे उल्लंघन झाल्यास उमेदवाराचे नामनिर्देशन रह होणे, दंड किंवा ठरावीक कालावधीसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याची कारवाई होऊ शकते. निकाल लागल्यानंतर तीस दिवसांत खर्च सादर करणे बंधनकारक आहे. जर खर्च सादर केला नाही तर पुढील निवडणुकीत उमेदवारीवर गंडांतर येते. त्यामुळे खर्च सादर करणे आवश्यक आहे.

बळवंत गायकवाड, खर्च निरीक्षक.

सर्वाधिक खर्च पांडे यांचा

४५१ उमेदवारांमध्ये सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार म्हणून शिवानी पांडे यांचा क्रमांक लागतो. त्यांनी सादर केलेल्या आकडेवारीनुसार २ लाख २९ हजार ६०२ रुपये इतका खर्च झाला असून, सर्वांत कमी खर्च अपक्ष उमेदवार नूतन कोरडे (२०३०) यांचा झाला आहे.

टू व्होटर एपवर अल्प प्रतिसाद...

खर्च सादर करण्यासाठी टू व्होटर एपवर दैनंदिन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, त्यावर खर्च नोंदणी करताना कागदपत्र अपलोड होत नाहीत, तसेच काही वेळेला नेटवर्क समस्या येत असल्याने त्यावर खर्च टाकता येत नसल्याचे उमेदवारांचा म्हणणे आहे. त्यामुळे अनेक उमेदवार दैनंदिन स्वरूपात निरीक्षकांकडे खर्च नोंदणी करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik Election: 451 Candidates Spent ₹1.35 Crore on Campaigning

Web Summary : 451 Nashik candidates spent ₹1.35 crore on campaigning until January 12th. Candidates must submit expenses or face disqualification. Shivani Pandey spent the most; Nutan Korde, the least.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Nashik Municipal Corporation Electionनाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६Girish Mahajanगिरीश महाजनBJPभाजपाPoliticsराजकारणNashikनाशिकShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस