नाशिक - महापालिकेतील नगररचना विभागातील सहाय्यक संचालक आकाश बागूल यांची अहमदनगर येथे बदली झाली असून त्यांच्या जागेवर अहमदनगर येथील सुरेश देवराम निकुंभे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बागूल यांच्या बदलीसाठी सत्ताधारी भाजपातील एक आमदार प्रयत्नशिल होते. त्यामुळे तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण होण्यापुर्वीच बागूल यांची बदली करण्यात आली आहे.महापालिकेच्या नगररचना विभागात आकाश बागूल हे १ जून २०१५ रोजी रुजू झाले होते. त्यांच्या कारकीर्दीत गेल्या तीन वर्षांपासून भिजत पडलेला कपाटाचा प्रश्न मार्गी लागेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु, अद्याप शासनस्तरावरुन त्याला हिरवा कंदील मिळालेला नाही. बागूल यांच्या कारकीर्दीतच आयुक्तांच्या पुढाकाराने नगररचना विभागात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याबरोबरच बांधकाम परवानग्यांसाठी आॅटो डीसीआर कार्यप्रणाली कार्यान्वित करण्यात आली. दरम्यान, आता शासनाने अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी धोरणच आखले असल्याने नगररचना विभागात या प्रकरणांचा निपटरा करण्यासाठी सत्ताधारी भाजपाकडून मर्जीतल्या माणसाची नियुक्ती करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यानुसार, बागूल यांची अखेर अडीच वर्षातच नगरला बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त जागेवर अहमदनगर येथील सहाय्यक संचालक सु. दे. निकुंभे यांची वर्णी लावण्यात आली आहे.निकुंभे यांना मनपाचा अनुभवआकाश बागूल यांच्या रिक्त जागेवर नियुक्ती झालेले सुरेश देवराम निकुंभे यांनी यापूर्वी नाशिक महापालिकेत दि. १६ आॅक्टोबर २०१२ ते ५ मार्च २०१४ या कालावधीत नगररचना विभागात प्रभारी सहाय्यक संचालक म्हणून कामकाज पाहिले आहे. त्यामुळे त्यांना नाशिक महापालिकेच्या कामकाजाची व नगररचना विभागातील कार्यपद्धतीची माहिती आहे. त्या अनुभवाचा फायदा त्यांना आता मिळणार आहे.
नाशिक महापालिकेतील नगररचना सहाय्यक संचालक आकाश बागूल यांची नगरला बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 19:21 IST
नगररचना विभाग : सु. दे. निकुंभे यांची नियुक्ती
नाशिक महापालिकेतील नगररचना सहाय्यक संचालक आकाश बागूल यांची नगरला बदली
ठळक मुद्दे बागूल यांच्या बदलीसाठी सत्ताधारी भाजपातील एक आमदार प्रयत्नशिल होतेबागूल यांची अखेर अडीच वर्षातच नगरला बदली