नाशिक : महापालिकेसाठी १०० प्लसचा नारा देणान्या भाजपाने एक एक करून सर्वच पक्षातील प्रमुख चेहऱ्यांना आपल्या तंबूत आणून सत्तेसाठीची गोळाबेरीज करण्यास सुरुवात केली असून यातील सर्वात प्रमुख अंक गुरुवारी पहायला मिळाला. भाजपाने उद्धवसेना, मनसे आणि काँग्रेस अशा सर्व पक्षीय नेत्यांचा भाजपात समावेश केला आहे. भाजपाच्या या रणनितीमुळे गेल्यावेळी सहा नगरसेवक असलेल्या काँग्रेसमध्ये आता शून्य संख्या झाली आहे. उद्धवसेनेचेही घर खाली झाले असून महापालिका निवडनुकीसाठी रणनीती ठरवणाऱ्या मनसे नेत्याला भाजपाने प्रवेश दिल्याने मनसेचाही कणा मोडला आहे.
गुरुवारी झालेल्या प्रवेश सोहळ्यात माजी आमदार नितीन भोसले, वैशाली भोसले, शाहू खैरे, माजी महापौर विनायक पांडे, ऋतुराज पांडे, अदिती पांडे, अनिता पांडे, यतीन वाघ, दिनकर पाटील, लता पाटील, अमोल पाटील यांच्या हाती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कमळ दिले यावेळी आमदार अॅड. राहुल विकले, आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार, लक्ष्मण सावगी, विक्रय साने, बाळासाहेब सानप, सुधाकर बडगुजर, सुनील बागूल, प्रदीप पेशकार, नाना शिलेदार उपस्थित होते. बाहेर झालेल्या प्रचंड गदारोळानंतर मंत्री महाजन पक्षाच्या सभागृहात येताच औरदार घोषणाबाजी करण्यात आली.
महाजनांना रोखण्याचा प्रयत्न
मंत्री गिरीश महाजन पत्रकारांशी बोलून पक्षाच्या प्रवेशद्वारावर येताच नाराज गटाने 'जय श्रीराम अशा घोषणा देत महाजन यांचा सता रोखला, भाऊ हा निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय असून आम्ही फक्त सतरंज्याच उचलायच्या का?, ज्यांनी आमच्या धसंवर दगडफेक केली त्यांनाच आज पक्षात प्रवेश कसा काय? याचं उत्तर द्या, असं म्हणत महाजन यांना घेराव घातला. तेव्हा पोलीस अन् काही पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्तीने महाजन कसेबसे आतमध्ये गेले. पक्ष प्रवेश झाल्यानंतर महाजन कोणाशीही काही न बोलता तेथून बाहेर पळाले.
आम्ही आज पक्षाची भिंत...
आमदार देवयानी फरांदे यांचे समर्थक, प्रभाग १३ मधील नाराज गटातील कार्यकर्ते मोठचा संख्येने जमले होते. त्यांनी शाहू खैरे यांचे नाव न घेता त्यांच्या विरोधाच्या घोषणा दिल्या. आज पक्षाला तडे देण्यासाठी आयारामांचा प्रवेश होतोय पण आम्ही हे होऊ देणार नाही. पक्षाची भिंत बनून आम्ही प्रवेशद्वारावर उभे असून हा प्रवेश रोखूच असा निर्धार नाराज गटाने व्यक्त केला. शहराध्यक्ष सुनील केदार यांना खाडे बोल सुनावले.
आमदार ढिकले, सुनील केदारांनी आत आणले
बाहेर गदारोळ सुरु असताना पोलिमांनी रोखून धरलेल्या खैरे, विनायक पांडे, नितिन भोसले यांना आत घेऊन या अशी सूचना महाजन यांनी आमदार राहुल ढिकले यांना केली. तेव्हा सुनील केदार हे पुढल्या गेटमधून बाहेर पहले अन् पोलिसांच्या देखरेखीत पांडे, खैरे, भोसले यांना मागच्या दरवाजाने आत घेऊन गेले.
मी गेल्या चाळीस वर्षात माझ्यावर कधी अन्याय झाला तरी जाहीर भूमिका मांडलेली नाही. पक्षाच्या जुन्या कार्यकत्यांवर अन्याय झाला तर कुठे तरी भूमिका मांडली पाहिजे असे माझे मत आहे. त्यामुळे मी सोशल मीडियावर पोस्ट टाकली पक्षाची नेता या नात्याने मी पक्षात आलेल्या सर्वांचे स्वागत करते. मी पक्षाचे नेते गिरीश महाजन यांच्यावर नाराज नाही. परंतु त्यांना काही लोकांनी चुकीच्या पद्धतीने ब्रिफ केले आहे. काही दलाल आणि स्वार्थी लोकांनी आपल्या घरातच उमेदवारी राहावी यासाठी हे राजकारण केले आहे. माझ्याबरोबर पक्षाचे जुने नेते आणि कार्यकर्ते उभे राहिले असते तर मला अधिक बरे वाटले असते.
- आमदार देवयानी फरांदै, निवडणूक प्रमुख भाजप
आमचे १०० प्लस नगरसेवक नाशिकमधून निवडून येतील. यापूर्वी जे विरोधात होते ते भाजपात आले. ते पूर्वी विरोधात असल्याने टीका करणारच. पण त्यांना चूक समजल्यावर ते आमच्याकडे येत आहेत. कोणी प्रवेश केला म्हणून उमेदवारी दिली असे नाही. सर्वांना विश्वासात घेऊन तिकीट देणार. आमदार देवयानी फरांदे यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. त्या नाराज नाहीं. आजच्या प्रवेशाविषयाची आम्ही वरिष्ठांना माहिती कळविली होती. निवडणुकीचे गणित बघून काही निर्णय घ्यावे लागतान, उमेदवारी देण्याचा निर्णय कोअर कमिटी घेईल, नाराज लोकांची आम्ही समजूत काढू, जुन्या कार्यकत्यांनी काळजी करू नये. पक्षात, फक्त थोडे थांबा. राग तुमच्या मनात आहे मी समजू शकतो. जुने-नवे एकत्र येऊन नाशिक महापालिकेवर सत्ता आणू.
- गिरीश महाजन
Web Summary : Nashik BJP inducts leaders from Congress, Sena, and MNS, aiming for municipal power. Congress faces near wipeout, Sena weakened, and MNS's strategy hit. Internal dissent arose over new entrants, with loyalists protesting.
Web Summary : नाशिक भाजपा ने कांग्रेस, सेना और मनसे के नेताओं को शामिल किया, जिसका उद्देश्य नगर निगम की सत्ता हासिल करना है। कांग्रेस का सफाया, शिवसेना कमजोर, और मनसे की रणनीति को झटका। नए प्रवेशकों पर आंतरिक असंतोष।