Nashik: 'आई, तुला त्रास द्यायचा नाही, तू...'; पोलीस महिलेच्या लेकीने आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:55 IST2025-07-21T13:53:22+5:302025-07-21T13:55:32+5:30

नाशिकमध्ये पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिलेच्या २० वर्षीय मुलीने आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. तरुणीने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे. 

Nashik: 'Mom, I don't want to bother you'; Policewoman's daughter ends life, what's in the suicide note? | Nashik: 'आई, तुला त्रास द्यायचा नाही, तू...'; पोलीस महिलेच्या लेकीने आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये काय?

Nashik: 'आई, तुला त्रास द्यायचा नाही, तू...'; पोलीस महिलेच्या लेकीने आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये काय?

Nashik Crime news: 'आई, तुझी कामामुळे खूप धावपळे होते. तुला त्रास द्यायचा नाही.' हे ह्रदय पिळवटून टाकणारे शब्द आहेत, २ ० वर्षीय पूजाचे! उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या पूजाने अचानक गळफास घेऊन आत्महत्या केली. नाशिकमधील अमृतधामध्ये ही घटना घडली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पूजा दीपक डांबरे (वय २० वर्ष, रा. अमृतधाम) असे अकालीच आयुष्याला पूर्णविराम देणाऱ्या तरुणीचे नाव आहे. पूजाची आई नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे. पूजाच्या आत्महत्येप्रकरणी आडगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

'आई, तू टेन्शन घेऊ नको', आईसाठी चिठ्ठी लिहून केली आत्महत्या 

पूजाने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. ही सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे. पूजाने बारावी उत्तीर्ण केली होती आणि पदवीचे शिक्षण घेत होती. पूजाची आई आणि वडील विभक्त राहतात. 

पूजा आईसोबत राहत होती. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने शिक्षण घेणे अवघड असल्यामुळे ती तणावात होती. 

"आई, तुझी कामामुळे खूप धावपळ होते. तुला त्रास द्यायचा नाही. माझ्या शिक्षणाचा खर्च फार आहे. तू टेन्शन घेऊ नको', अशी सुसाईड नोट लिहून पूजाने घरातच मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. 

Web Title: Nashik: 'Mom, I don't want to bother you'; Policewoman's daughter ends life, what's in the suicide note?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.