शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अतुलनीय शौर्य दाखवत शहीद झालेल्या जवानाला कन्यारत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 13:14 IST

पाकने केलेल्या गोळीबारात सिन्नर तालुक्यातल्या शिंदेवाडी (श्रीरामपूर) येथील केशव सोमगीर गोसावी हे शहीद झाले होते.

नाशिक- पाकने केलेल्या गोळीबारात सिन्नर तालुक्यातल्या शिंदेवाडी (श्रीरामपूर) येथील केशव सोमगीर गोसावी हे शहीद झाले होते. जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमध्ये सीमेवर गस्त घालणारे नाईक केशव सोमगीर गोसावी (२९) हे भारतीय लष्कराचे जवान पाकने केलेल्या गोळीबारात रविवारी शहीद झाले.मराठा लाइट इन्फन्ट्रीमधील केशव मूळचे नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील श्रीरामपूर (शिंदेवाडी) गावचे होते. मराठा लाइट इन्फन्ट्रीची तुकडी गस्त घालत असता शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकच्या बाजूने ‘स्नायपर’ हल्ला झाला. त्यात केशव हे शहीद झाले. भारतीय लष्कराने या हल्ल्याला उत्तर देऊन पाकिस्तानी चौक्यांचे नुकसान केले. या हल्ल्यात जवान केशव गोसावी यांना गोळी लागून ते जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तेथे उपचार सुरू असताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले असता, अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेल्या हजारो नागरिकांना अश्रू अनावर झाले होते.ज्यावेळी ते शहीद झाले, तेव्हा त्यांची पत्नी नऊ महिन्यांची गर्भवती होती. त्या शहीद जवानाच्या पत्नीला कन्यारत्न झालं आहे. अपत्याला लष्करात भरती करण्याचं स्वप्न केशव गोसावी यांनी उराशी बाळगलं होतं. परंतु स्वप्न पाहणाऱ्या केशव गोसावी यांना मुलीच्या जन्माच्या आठवड्याआधीच वीरमरण आलं. घरातला कर्ता पुरुष गमावल्यानंतर गोसावी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आठ दिवसांनी का होईना त्यांच्या घरात काहीसं आनंदाचं वातावरण आहे. गोसावी यांच्या कुटुंबीयांना सरकारनं 25 लाखांची मदतही जाहीर केली आहे.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानSoldierसैनिकNashikनाशिकJammu Kashmirजम्मू-काश्मीर