Nashik: लाईफ इन्शूरंसच्या असिस्टंट ब्रँच मॅनेजरने केला महिलेचा विनयभंग

By नामदेव भोर | Updated: June 23, 2023 16:22 IST2023-06-23T16:20:11+5:302023-06-23T16:22:18+5:30

Nashik: राजीव गांधीभवन परिसरातील कोटक महिंद्रा लाईफ इन्शूरन्स याठिकाणी असिस्टंट ब्रँच मॅनेजनर संशयित अमोल कारभारी जाधव (रा. शिवरामनगर कॉलनी, जेलरोड, नाशिकरोड) याने एका महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे .

Nashik: Life insurance assistant branch manager molested a woman | Nashik: लाईफ इन्शूरंसच्या असिस्टंट ब्रँच मॅनेजरने केला महिलेचा विनयभंग

Nashik: लाईफ इन्शूरंसच्या असिस्टंट ब्रँच मॅनेजरने केला महिलेचा विनयभंग

- नामदेव भोर  
नाशिक : राजीव गांधीभवन परिसरातील कोटक महिंद्रा लाईफ इन्शूरन्स याठिकाणी असिस्टंट ब्रँच मॅनेजनर संशयित अमोल कारभारी जाधव (रा. शिवरामनगर कॉलनी, जेलरोड, नाशिकरोड) याने एका महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटक महिंद्रा लाईफ इन्शूरन्स कार्यालयातील संशयित असिस्टंट ब्रँच मॅनेजर अमोल कारभारी जाधव याने पिडितेला तुम्हाला करीअर कसे करायचे हे शिकवून देईल, असे बोलून जवळीक निर्माण करीत पिडितेसोबत अंगलट करीत तिचे चुंबन घेतले. तसेच त्याच्या मोबाईलमध्ये किस करतानाचे फोटो घेवून ते पतीला दाखविण्याची धमकी देत पिडितेला मारहाण करून अश्लील भाषेत शिविगाळ केली. त्यामुळे पिडितेने सरकारवाडा पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार पोलिसांसमोर कथन करीत असिस्टंट ब्रँच मॅनेजर अमोल जाधव याच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलिस निरीक्षक खैरनार या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Nashik: Life insurance assistant branch manager molested a woman