Nashik Kumbh Mela 2027 update: प्रयागराज येथे कुंभात झालेल्या दुर्घटनेनंतर राज्य शासनही सजग झाले असून, गर्दी आटोक्यात यावी, वाहतुकीचे नियोजन सुरळीत व्हावे, यासाठी प्रशासनातर्फे अडीच हजार सीसीटीव्हींची नजर ठेवण्यात यणार आहे. विशेष म्हणजे गुगलच्या मदतीने मोबाइल लोकेशनवर गर्दीचे नियमन मिळविले जाणार असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महापालिकेने आराखडा करण्यास सुरुवात केली आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात कोट्यवधी भाविकांचे नाशिकमध्ये आगमन होणार असल्याने गर्दी नियंत्रण आणि वाहतूक नियोजन हे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका व शहर पोलिस दलाने एकत्रितपणे अत्याधुनिक तंत्रानाचा वापर करून सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यास सुरुवात केली आहे.
या आराखड्यात महत्त्वाचा भाग म्हणजे शहरात तब्बल अडीच हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, त्या कॅमेऱ्यांमधून थेट वाहतूक परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. विशेष म्हणजे गर्दीच्या ठिकाणी त्वरित निर्णय घेता येणार आहे. यासाठी कॅमेरे सुरू झाल्यावर सुमारे सहा महिने सिमुलेशन पद्धतीने या व्यवस्थेचा अभ्यास होणार आहे.
भाविकांचा वेळ वाचण्यास होणार मदत
वाहतूक व्यवस्थेच्या आराखड्याला आणखी बळकटी देण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासन गुगलसोबत थेट बैठक घेणार आहे.
आराखडा गुगलला उपलब्ध करून दिल्यानंतर जगभरातून येणाऱ्या भाविकांना गुगल मॅपच्या माध्यमातून रस्त्यांची आणि पर्यायी रस्त्यांची अद्ययावत माहिती मिळणार आहे. यामुळे भाविकांचा वेळ वाचणार आहे.
महापालिकेच्या वतीने विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम सुरू असून, मोबाइल लोकेशन, सीसीटीव्ही नेटवर्क व वाहतूक विभागाची माहिती यांचा एकत्रित वापर करून आधुनिक प्रणाली कार्यान्वित केली जात आहे. यावर नियोजन सुरू आहे.
रियल-टाइम गर्दीवर लक्ष
- कुंभमेळ्यात विविध भागांत गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे आणि सेन्सर्स बसवून, गर्दीची घनता मॉनिटर केली जाईल.
- गुगलच्या मॅप्स, सॅटेलाइट इमेजरी, स्थानिक डेटा यांचा वापर करणार
- अधिक गर्दी वाढल्यास, त्वरित सूचना पाठवून त्या भागातील लोकांना वेगळ्या मार्गावर दिशादर्शन करता येणार
- मोबाइल अॅप्समध्ये "क्राऊड अलर्ट" सुविधा पुरविणार
- सिंहस्थात गुगल आणि प्रशासन भाविकांना वेळापत्रक, रस्ता बदल, प्रवेशद्वारांची माहिती वेळेत देणार
- गुगलच्या ट्रॅफिक डेटा व रियल-टाइम ट्रॅफिक अपडेट्सचा वापर, वाहतुकीचे नियोजन करणार, इमेज रेकग्निशन व डेटा बेसचा वापर करून मेळ्यातील कॅमेरा नेटवर्कशी जोडून, हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेता येईल.
Web Summary : For the 2027 Nashik Kumbh Mela, authorities will use 2,500 CCTVs and Google Maps to manage crowds and traffic. Real-time data will help devotees navigate routes, with alerts about congestion.
Web Summary : 2027 नाशिक कुंभ मेले के लिए, अधिकारी भीड़ और यातायात को प्रबंधित करने के लिए 2,500 सीसीटीवी और गूगल मैप्स का उपयोग करेंगे। रियल-टाइम डेटा से श्रद्धालुओं को मार्गों पर नेविगेट करने में मदद मिलेगी, और भीड़भाड़ के बारे में अलर्ट मिलेंगे।