Nashik: कल्याणमधील सासरच्यांकडून विवाहितेचा छळ, नाशिकमध्ये पतीसह सासरच्या १२ जणांविरोधात गुन्हा

By नामदेव भोर | Updated: July 13, 2023 15:31 IST2023-07-13T15:27:32+5:302023-07-13T15:31:22+5:30

Nashik: विवाहित महिलेचा छळ करू तिच्यावर माहेरून १५ लाख रुपये आणण्यासाठी तिला शिविगाळ करीत तिचा शारिरीक आणि मानसिक छळ केल्याच्या प्रकरमात देवळाली कँम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

Nashik: Harassment of wife by in-laws in Kalyan, case against 12 in-laws including husband in Nashik | Nashik: कल्याणमधील सासरच्यांकडून विवाहितेचा छळ, नाशिकमध्ये पतीसह सासरच्या १२ जणांविरोधात गुन्हा

Nashik: कल्याणमधील सासरच्यांकडून विवाहितेचा छळ, नाशिकमध्ये पतीसह सासरच्या १२ जणांविरोधात गुन्हा

- नामदेव भोर 
नाशिक - कल्याणच्या बदलापूर रोड परिसरात राहाणाऱ्या शेख कुटुंबाकडून नाशिकमधील एका विवाहित महिलेचा छळ करू तिच्यावर माहेरून १५ लाख रुपये आणण्यासाठी तिला शिविगाळ करीत तिचा शारिरीक आणि मानसिक छळ केल्याच्या प्रकरमात देवळाली कँम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित महिलेने देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार सासरच्या मंडळीने तिचा २० डिसेंबर २०२१ ते ६ जून २०२२ या कालावधीत फ्लॅट घेण्यासाठी माहेरून १५ लाख रुपये आणण्यासाठी शिविगाळ व मारहाण करून छळ केला. यात तिचा पती आवेश सलीम शेख, सासरे सलीम शेख, सासु नसीम सलीम शेख, ननंद शबीना मुबीन शेख, नंदोई मुबीन शेख, भाची आनम मुबीन शेख, भाचा आनस मुबीन शेख, जाव शहीन ताहीर शेख, ननंद अरशी नबी पाला, (सर्व रा. वालधुनी बदलापुर रोड, कल्याण) तसेच भगूरच्या मुल्ला गल्ली येथील शमीन बशीर शेख, बशीर शेख, रियाज शेख यांच्याविरोधात पिडित महिलेने देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात तिचा मानसिक आणि शारिरीक छळ केल्या प्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून महिला पोलिस हवालदार म्हसदे या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Nashik: Harassment of wife by in-laws in Kalyan, case against 12 in-laws including husband in Nashik