मुसळधार पावसाच्या सरींनी नाशकातील रस्ते जलयम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 16:11 IST2020-06-15T16:09:00+5:302020-06-15T16:11:11+5:30
नाशिक शहरात सोमवारी पावसाने सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जोर धरला असून पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्याने विविध भागातील रस्ते जलमय झाले. त्याचप्रमाणे शहरातील पाण्याच्या प्रवाह थेट गोदावरीला जाऊन मिळत असल्याने गोदावरीचा जलस्तरही काही प्रमाणात वाढला आहे.

मुसळधार पावसाच्या सरींनी नाशकातील रस्ते जलयम
नाशिक : शहरात सोमवारी दुपारपासून सुरू असलल्या पावसाने सायंकाळी चार वाजेच्या सुमारास जोर धरला असून पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्याने शहराती विविध भागातील रस्ते जलमय झाले आहेत. त्याचप्रमाणे शहरातील पाण्याच्या प्रवाह थेट गोदावरीला जाऊन मिळत असल्याने गोदावरीचा जलस्तरही काही प्रमाणात वाढला आहे.
नाशिक शहरासह पंचवटी परिसरात यापूर्वी शुक्रवारी वारा व विजांच्या कडकडाटांसह पावसाने दमदारपणे हजेरी लावल्याने नागरिकांची त्रेधा उडाली. नाशिकच्या मुख्य बाजारपेठेसह मध्य नाशिकलादेखील पावसाने झोडपून काढले होते. हीच परिस्थिती सोमवारीही दिसून आली. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास झालेल्या पावसामुळे रस्त्यावरची वर्दळ पूर्णपणे ठप्प झाल्याने परिसरातील रस्ते काहीकाळ ओस पडल्याचे चित्र दिसून आले. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर गेल्या तीन ते चार दिवसांत दमदार पाऊस झाला असून सोमवारी मेघ गजर्नेसह आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. बाजारपेठेत विविध वस्तू खरेदीसाठी गेलेल्या नागरिकांची त्रेधा उडाली. शहरात दुपारपासूनच पावसाची रिरिप सुरु असल्याने विक्रेते सावध असल्याने त्यांनी दुकाने लवकरच आवरती घेतल्याने बाजारपेठ काहीकाळ ओस पडली होती. काही भागांतील रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने परिसरातील रस्ते जलमय झाले होते, तर सखल भागातील रस्त्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. शहरातील मेनरोड, दहीपूल, पंचवटीतील हिरावाडीरोड, जुना आडगावनाका, गणेशवाडी भाजी मंडई रस्ता, दिंडोरीरोड, गजानन चौक, अयोध्यानगरी, भागातील अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्यामुळे रस्ते जलमय झालेले दिसून आले.