Nashik: नाशिकला डाळिंब मार्केटमधील दहा दुकानांना आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 09:47 IST2023-04-25T09:47:16+5:302023-04-25T09:47:52+5:30

Nashik News: औरंगाबाद रोडवरील निलगिरीबाग नजीक असलेल्या प्रीमियम डाळिंब मार्केट मधील 9 ते 10 गाळयांना मंगळवारी (दि.25) सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमाराला आग लागल्याची घटना घटली आहे.

Nashik: Fire broke out at ten shops in Nashik's Pomegranate Market | Nashik: नाशिकला डाळिंब मार्केटमधील दहा दुकानांना आग

Nashik: नाशिकला डाळिंब मार्केटमधील दहा दुकानांना आग

- संदीप झिरवाळ
नाशिक- औरंगाबाद रोडवरील निलगिरीबाग नजीक असलेल्या प्रीमियम डाळिंब मार्केट मधील 9 ते 10 गाळयांना मंगळवारी (दि.25) सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमाराला आग लागल्याची घटना घटली आहे.

या घटनेत जवळपास अनेक पत्र्याचे गाळे व त्यातील वस्तू जळून खाक झाल्या आहेत सदर घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळताच घटनास्थळी पंचवटी नाशिक रोड पंचवटी उपकेंद्र क का वाघ आदी ठिकाणचे पाच पाण्याचे बंब रवाना करण्यात आले असून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दलातर्फे सुरू आहे.

सदरची कशामुळे लागली याची स्पष्टोक्ती झाली नाही. आग लागल्याची घटना घडल्यानंतर डाळिंब मार्केटमध्ये व्यापाऱ्यांकडे काम करणाऱ्या अनेक कामगारांनी प्लास्टिक ग्रेट बाहेर काढण्याचे काम सुरू केले होते.

औरंगाबाद रोडवरील निलगिरी बागेजवळ प्रीमियम मार्केट असून या ठिकाणी फळ विक्रीचे काम चालते मंगळवारी सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमाराला अचानकपणे धूर निघू लागला गाळ्यात गवत, पुठ्ठे व खोके असल्याने काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीचा मोठा भडका उडाला होता. सदर घटनेत डाळिंब, आंबे तसेच द्राक्ष फळ यासह गाळयातील इतर साधन साहित्य जळून खाक झाल्याचे वृत्त आहे. सदर आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडल्याचे बोलले जात आहे घटल्यानंतर आडगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते.

Web Title: Nashik: Fire broke out at ten shops in Nashik's Pomegranate Market