शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार ! कुटुंबीयांनी धानोरकरांवर केले गंभीर आरोप
2
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
3
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
4
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!
5
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल; गाझाशी आहे कनेक्शन
6
IND vs WI 2nd Test: बुमराहला संघाबाहेर ठेवणार? Playing XI मध्ये 'हे' २ बदल होण्याची शक्यता
7
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
8
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
9
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
10
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
11
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
12
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
13
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?
14
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
15
मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली...
16
प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
17
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
18
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
19
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
20
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?

Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 13:54 IST

Nashik Crime Murder News: नाशिक रोड परिसरात एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत व्यक्ती धावत सुटला पण, घराजवळच कोसळला आणि त्याचा रक्ताच्या थारोळ्यातच जीव गेला.

Nashik Crime Latest News : गुरूद्वारात सेवा करून तो निघाला आणि पुढील काही वेळातच त्याचा जीव गेला. गेल्या काही दिवसांपासून पाळत ठेवत असलेल्या दोन व्यक्तींनी ४१ वर्षीय अमोल शंकर मेश्राम याची हत्या केली. नाशिक रोड परिसरातील जय भवानी रोड परिसरात ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी घराजवळच अमोलला अडवले आणि धारदार शस्त्राने सपासप वार केले. त्याने पळण्याचा प्रयत्न केला, पण घराजवळच तो कोसळला आणि रक्ताच्या थारोळ्यात त्याचा जीव गेला. ज्यावेळी अमोल मेश्राम घराच्या दिशेने पळत होता, तेव्हाच त्याचे आईवडील तिथे आले. त्यांनी पळता पळता खाली पडलेल्या अमोलला बघून एकच हंबरडा फोडला आणि परिसरातील लोक जमा झाले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

घर खरेदी-विक्रीच्या जुन्या वादातून डावखरवाडी येथील रहिवासी असलेल्या अमोल शंकर मेश्राम (वय ४१) यास दुचाकीने आलेल्या दोघांनी मंगळवारी (७ ऑक्टोबर) अडवून धारदार शस्त्राने वार करत हत्या केली. 

रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या अमोलला नागरिकांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने जयभवानी रोड परिसर हादरला आहे.

अमोल मेश्रामची हत्या का करण्यात आली?

खुनाच्या घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत तपासाला गती दिली. पोलिसांनी काही तासात दोघा संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले. त्यापैकी एक अल्पवयीन असून दुसरा संशयित कुणाल सौदे (२१, रा. फर्नाडिसवाडी) याच्यासोबत फ्लॅट खरेदी-विक्रीच्या माध्यमातून जुना वाद असल्याच्या कारणावरून मेश्राम याच्यावर त्याने चॉपरसारख्या धारदार शस्त्राने वार करून ठार मारल्याची कबुली दिली आहे, असे पोलिस उपायुक्त किशोर काळे यांनी सांगितले.

जखमी अवस्थेत अमोल घराकडे धावत सुटला...

अमोल याच्यावर हल्लेखोरांनी शस्त्राने वार केल्यानंतर त्याने जखमी अवस्थेत घराच्या दिशेने धावायला सुरुवात केली; मात्र काही अंतरावर तो कोसळला.

त्याची आई नीलिमा व वडील शंकर मेश्राम हे दोघेही नित्यानंद आश्रमात दर्शनासाठी गेले होते. घराजवळ गर्दी बघून गाडीतून त्यांनी खाली उतरून बघितले असता त्यांना आपल्या रक्तबंबाळ मुलाला बघून धक्का बसला.रक्ताच्या थारोळ्यात 3 कोसळलेल्या मुलाला बघून त्यांनी हंबरडा फोडला. वडिलांनी धीर देत नागरिकांच्या मदतीने तातडीने अमोलला रुग्णालयात हलविले; मात्र त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मेश्राम राहत असलेल्या सद्‌गुरूनगरमधील साबरमती अपार्टमेंटजवळच रस्त्यावर हल्लेखोरांनी त्याच्यावर सपासप वार करत पलायन केले होते. त्याचे वडील रेल्वे टपाल विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी असून भाऊ दुबईमध्ये नोकरी करतो. याप्रकरणी त्याचे वडील शंकर मेश्राम (७०) यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

अमोलवर 'वॉच' ठेवून हल्ला

पुणे महामार्गावरील गुरुद्वारामध्ये अमोल मेश्राम हा दररोज नित्यनेमाने सेवा करण्यासाठी पहाटे जात होता. मंगळवारीही तो सेवा करून घराकडे परतत असताना हल्लेखोरांनी त्याला रस्त्यातच गाठले. या दोघा हल्लेखोरांनी त्याच्यावर वाँच ठेवून हा हल्ला केला असल्याचे बोलले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik: Man fatally attacked near home over property dispute.

Web Summary : Amol Meshram, 41, was murdered near his Nashik home by two attackers over a property dispute. The assailants, one a minor, fatally stabbed Meshram. He collapsed near his parents, who arrived to find him mortally wounded. Police have arrested the suspects.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसDeathमृत्यू