मुलाच्या लग्नाला अवघे काही दिवस उरले असतानाच आई वडिलांनी टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे. घरात लग्नसोहळ्याची तयारी सुरू असतानाच आई-वडिलांनी जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या माता-पित्याने एवढा टोकाचा निर्णय का घेतला, याचं कारण अद्याप समोर येऊ शकलेलं नाही.
या घटनेबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नाशिकमधील टिळकवाडी परिसरात वास्तव्यास असलेल्या शाह कुटुंबामध्ये लग्न सोहळ्याची लगबग सुरू होती. या कुटुंबातील धाकट्या मुलाचं लग्न २० दिवसांनी होणार होतं. मात्र या लग्नापूर्वीच शाह दाम्पत्याने टोकाचं पाऊल उचलत विषप्राशन करून आपलं जीवन संपवलं.
दरम्यान, शाह पती-पत्नीने रात्री मुलासोबत एकत्र जेवण केलं. त्यानंतर या दोघांनीही टोकाचा निर्णय घेत विषप्राशन करून या जगाचा निरोप घेतला. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरू केला आहे.