शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात नाराजीचा स्फोट! उमेदवारी जाहीर होताच १० मिनिटांत नाशिक भाजपा शहराध्यक्षाचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 12:48 IST

दोन्ही नावांऐवजी महापौरपदासाठी हिमगौरी आडके आणि उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांचे नाव घोषित करण्यात आले आणि शहराध्यक्ष सुनील केदार नाराज झाले.

नाशिक -  महापालिका निवडणुकीत अनेक प्रकारचे घोळ झाल्यानंतरही पक्षशिस्त म्हणून कायम राहिलेल्या शहराध्यक्ष सुनील केदार यांनी महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार घोषित होताच तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पुढील व्यवस्था होईपर्यंत आपण काम बघू असे त्यांनी पक्षनेत्यांना कळवले आहे.प्रदेश पक्षनेत्यांकडून जी नावे निश्चित झाली, ती डावलून दुसरीच नावे घोषित केल्याचा केदार यांचा दावा असल्याचे समजते. त्यामुळे भाजपात खळबळ उडाली आहे.

नाशिकच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी अनेक दावेदार होते. त्यात नवे आणि जुने अशा दोन्ही प्रकारचे दावेदार होते. काहींनी यापूर्वी खूप पदे भोगलेली होती तर काहींना नव्याने प्रवेश केल्यानंतर पहिल्याच वेळी पद हवे होते. महापालिका निवडणुकीत उमेदवारी वाटपाच्या वादातूनदेखील अनेकदा गोंधळ झाला होता. त्यावेळी केदार यांनी यापुढे पार्टीलाईनवर चालणारेच पदाधिकारी महापालिकेत नेमले जातील अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर स्थानिक कोअर कमिटी आणि इच्छुकांशी झालेल्या चर्चेनंतर चार नावे प्रदेश कोअर कमिटीकडे पाठवण्यात आली होती. यातून दोन नावे मंगळवारी दुपारी प्रदेश कार्यालयातून कळवण्यात येणार होती. 

त्यानुसार मंगळवारी सकाळी इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील तारांकित हॉटेलमध्ये नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीला पक्षाचे नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे देखील होते. त्यांनी पावणेदोन वाजेच्या सुमारास मुंबईत प्रदेश नेत्यांना फोन केला आणि त्यानंतर अंतिम नावे आल्याचे सांगितले. प्रदेश कार्यालयाकडे दोन नावे पाठवण्यात आली होती. त्यापैकी दोन्ही नावांऐवजी महापौरपदासाठी हिमगौरी आडके आणि उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांचे नाव घोषित करण्यात आले आणि शहराध्यक्ष सुनील केदार नाराज झाले.

ही दोन नावे कोणती?

स्थानिक भाजपाकडून चार नावे प्रदेश कार्यालयाकडे पाठवण्यात आली होती. त्यातील दोन नावे घोषित करण्यात आली खरी. मात्र, अन्य दोन नावे कोणती, हे पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी गुलदस्त्यातच ठेवली. आता केदार यांच्या राजीनाम्यामुळे ही दोन नावे कोणाची असा प्रश्न निर्माण झाला आहे.

देवेंद्र फडणवीस यांना मॅसेज

भाजपा नेते गिरीश महाजन यांनी पावणेदोन वाजेच्या सुमारास उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यानंतर केदार नाराज झाले. गेली ४१ वर्षे पक्ष संघटनेत आपण काम करीत आहोत. मात्र पक्षश्रेष्ठींकडून निश्चित झाल्याचा प्रकार पहिल्यांदाच घडल्याचा दावा केदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पाठवलेल्या पत्रात केल्याचे समजते.

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik BJP Chief Resigns After Candidates Announced; Party Infighting?

Web Summary : Nashik BJP city president Sunil Kedar resigned after mayoral candidates were announced, alleging names were overruled. Internal disputes surface as Kedar expresses discontent to party leaders. This fuels speculation about candidate selection and party dynamics.
टॅग्स :BJPभाजपाNashik Municipal Corporation Electionनाशिक महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGirish Mahajanगिरीश महाजन