धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 10:33 IST2026-04-13T10:32:57+5:302026-04-13T10:33:56+5:30

Nashik Crime News: बहुराष्ट्रीय कंपनीतील धर्मांतर तसेच लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या संशयित कर्मचाऱ्यांना तूर्त निलंबित करण्यात आले आहे, तर दुसरीकडे तपास पथकातर्फे कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, आरोपींची बॅक हिस्ट्रीदेखील गोळा करण्यात येत आहे.

Nashik: Accused in multinational company suspended in attempted conversion case | धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित

धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित

नाशिक -  बहुराष्ट्रीय कंपनीतील धर्मांतर तसेच लैंगिक अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या संशयित कर्मचाऱ्यांना तूर्त निलंबित करण्यात आले आहे, तर दुसरीकडे तपास पथकातर्फे कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, आरोपींची बॅक हिस्ट्रीदेखील गोळा करण्यात येत आहे. त्यातून अनेक बाबींंचा उलगडा होऊ शकतो.
 एसआयटी पथकाने संबंधित कंपनीकडून सीसीटीव्ही फुटेज मागवून अटकेतील संशयितांची सविस्तर माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. आरोपींनी ज्या कंपन्यांत काम केले, तेथे अशा प्रकारच्या तक्रारी होत्या का याचीही पडताळणी सुरू आहे. या तपासातून  गुन्ह्याची पद्धत उघड होऊ शकते. दरम्यान, कंपनी व्यवस्थापनाने अशा कृत्यांना पाठिंबा नसल्याचे स्पष्ट करत अटकेतील कर्मचाऱ्यांना तात्पुरते निलंबित केले आहे.

महिला पोलिसच गेल्या नोकरीचा अर्ज घेऊन
कंपनीत थेट पोलिस म्हणून प्रवेश करता येणार नाही म्हणून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या रणनीतीने पथकात महिला पोलिसांचा समावेश करण्यात आला. तीन महिला पोलिसांना साध्या वेशात नोकरी मिळविण्याच्या बहाण्याने कंपनीत पाठविले. त्यांनी तेथील काही महिला कर्मचाऱ्यांची ओळख करून घेतली. त्यातून कंपनीत काय चालते? याचा तपास केला होता.

अश्विनी आज कोर्टात 
कंपनीची ५१ वर्षीय ऑपरेशन मॅनेजर अश्विनीच्या पोलिस काेठडीची मुदत सोमवारी (दि.१३) संपत असल्याने तिला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाईल. अश्विनीवर पीडित मुलींच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.

Web Title : नाशिक: धर्मांतरण मामले में बहुराष्ट्रीय कंपनी के कर्मचारी निलंबित

Web Summary : नाशिक में, एक बहुराष्ट्रीय कंपनी में धर्मांतरण और यौन उत्पीड़न के मामले में गिरफ्तार संदिग्ध कर्मचारियों को निलंबित कर दिया गया है। पुलिस सीसीटीवी फुटेज की समीक्षा कर रही है और उनकी पृष्ठभूमि की जांच कर रही है, जिससे संभावित पैटर्न का पता चल रहा है। एक महिला पुलिस टीम ने कंपनी में गुप्त रूप से प्रवेश किया। एक ऑपरेशन मैनेजर अदालत में पेश होगी।

Web Title : Nashik: Multinational Company Employees Suspended in Conversion Attempt Case

Web Summary : In Nashik, suspects arrested in a conversion and sexual assault case at a multinational company have been suspended. Police are reviewing CCTV footage and investigating their background, revealing potential patterns. A female police team infiltrated the company undercover. An operation manager will appear in court.