शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

कर्जपरतफेड केल्यानंतरच नासाकाला नव्याने कर्जपुरवठा

By admin | Updated: July 25, 2014 00:39 IST

कर्जपरतफेड केल्यानंतरच नासाकाला नव्याने कर्जपुरवठा

नाशिक : नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी कर्जपुरवठ्याबाबत जिल्हा बॅँकेचे प्रशासक मंडळही अनुकूल आहे. परंतु नाबार्डच्या कायदेशीर बंधनामुळे कारखान्याने मागील कर्जाची परतफेड केल्यानंतरच प्रशासक मंडळ नव्याने कर्जपुरवठ्याचा विचार करू शकेल, असे मत जिल्हा बॅँकेचे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष ए. के. चव्हाण यांनी सभासदांच्या सहविचार सभेच्या सदस्यांसमोर मांडले. सभासदांच्या सहविचार सभेचे अध्यक्ष व कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद पां. भा. करंजकर यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांनी प्रशासक मंडळाचे अध्यक्ष ए. के. चव्हाण व तुषार पगार यांच्याशी चर्चा केली. यावेळी नासाकाच्या गळितासाठी बॅँकेने कर्ज उपलब्ध करून देण्याविषयी विविध बाजूंनी चर्चा झाली. कारखान्याकडील थकीत कर्जवसुलीसाठी बॅँकेस सरफेशी अ‍ॅक्ट २००२ अन्वये कारवाई करावी लागली आहे. अशा अवस्थेत कारखान्याचा एन.पी.ए. व अपुरा दुरावा नियमापेक्षा जास्त वाढल्याने नाबार्ड आणि राज्य बॅँक यांच्या परवानगीने तसेच शासनाची थकहमी मिळाली, तरच नव्याने कर्जपुरवठा करणे शक्य आहे. कारखान्याच्या १९३ एकर २० गुंठे जमीन क्षेत्रातील काही मालमत्ता विक्री करून कर्जपरतफेड केल्यास नव्याने कर्जपुरवठा करणे शक्य आहे. या मालमत्ता विक्रीबाबतचा प्रस्ताव राज्य साखर कारखान्याकडे पाठविण्यात आल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, साखर विक्रीचा उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश न्यायालयाने रद्द ठरविला आहे. या अनुषंगानेच कामगार आयुक्तांचा निर्णय होईल. त्यामुळे या साऱ्या मुद्द्यांवरून आजतरी बॅँक नवीन कर्जपुरवठा करू शकेल, असे वाटत नसल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नासाका चालविण्याचा पुनर्विचार केला, तर कारखाना पूर्ववत सुरू होऊ शकेल, असे मत पां. भा. करंजकर यांनी व्यक्त केले.