नाशिक : नाशिकसारख्या प्रगत सुधारणावादी शहराची सेवा करण्याची मला केवळ दीड वर्षे संधी लाभली. धार्मिक, पौराणिक वारसा असलेल्या या शहराची शेती, उद्योग, पर्यटन अशा सगळ्याच क्षेत्रात घोडदौड सुरू आहे. येथील माती, माणसे, निसर्ग, आल्हाददायक वातावणामुळे नाशिकच्या प्रेमात कोणताही माणूस पडतोच, अशा चांगल्या शहराला सोडून जाताना अंत:करण निश्चित जड आहे. या शहरासोबतचा ऋणानुबंध नेहमीच कायम राहील. नाशिककर चांगल्या कामांना साथ देणारे असून, कायद्याचे पालन करणारी जनता या शहरात आहे, अशा भावना शुक्रवारी मावळते आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी एका ध्वनीफितीद्वारे व्यक्त केली. शहरातील विविध व्हॉटस्अॅप ग्रुपवर त्यांची ही ध्वनीफित चांगलीच गाजत आहेत. नेटिझन्सकडून ध्वनिफित प्रचंड व्हायरल केली जात आहे.
नाशिकचा निरोप घेताना नांगरे पाटील भावुक; अंत:करण जड असल्याची व्यक्त केली भावना
By अझहर शेख | Updated: September 4, 2020 22:16 IST
नांगरे पाटील यांची मुंबईत सहआयुक्तपदी बदली झाली त्यांनी शुक्रवारी या पदाचा कार्यभारही स्विकारला. नाशिकच्या पोलीस आयुक्तपदाची सुत्रे दीपक पाण्डेय यांनी त्यांच्याकडून सकाळी सहा वाजताच स्विकारली.
नाशिकचा निरोप घेताना नांगरे पाटील भावुक; अंत:करण जड असल्याची व्यक्त केली भावना
ठळक मुद्देशहराला साडेपाच हजार सीसीटीव्हींची गरजनेटिझन्सकडून ध्वनिफित प्रचंड व्हायरल