शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरकरांचा कडकडीत बंद; मूक मोर्चा

By admin | Updated: September 16, 2014 00:25 IST

नांदूरकरांचा कडकडीत बंद; मूक मोर्चा

नांदूरशिंगोटे : पावणेचार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार करून फरार झालेल्या आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी व मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून मूक मोर्चा काढला. यावेळी ग्रामस्थांनी निषेध सभा घेऊन आरोपीला अटक करण्याच्या मागणीचे निवेदन पोलिसांना दिले.गेल्या शुक्रवारी नांदूरशिंगोटे शिवारात संशयित आरोपी सुदाम रामनाथ शेळके याने पावणेचार वर्षाची बालिकेवर बलात्कार केल्याचा गुन्हा वावी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला होता. सदर प्रकारानंतर संशयित आरोपी फरार झाला होता. पोलीस याप्रकरणी तीन दिवसांपासून आरोपीचा शोध घेत आहे.संशयित आरोपीला अटक करण्यात यावी व सदर घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी सकाळी ८ वाजता ग्रामस्थ रेणुका माता मंदिराच्या प्रांगणात एकत्र आले. बाजारतळ, नेहरू चौक, शनिगल्ली, चावडी, अचानक चौक व निमोणनाका यामार्गाने मूूक मोर्चा काढण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ व्यावसायिक व दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली. ग्रामस्थांनी गावातून मूक मोर्चा काढल्यानंतर रेणुकामाता मंदिराच्या प्रांगणात निषेध सभा घेतली. यावेळी क्रांतिवीर वसंतराव नाईक पतसंस्थेचे उपाध्यक्ष पारब्ध शेळके, शिक्षक-पालक संघाचे उपाध्यक्ष नानासाहेब शेळके, संघर्ष गु्रपचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी आपल्या भाषणात सदर घटनेचा निषेध नोंदवून नराधमाच्या अटकेची मागणी केली. पोलिसांनी योग्यरीतीने तपास करून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शेकडो ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक ए. सी. बस्ते यांना देण्यात आले. यावेळी सरपंच अशोक गवारे, उपसरपंच रवींद्र शेळके, ग्रामपंचायत सदस्य गोपाळ शेळके, दीपक बर्के, संदीप शेळके, पी.डी. सानप, विनायक शेळके, शंकर शेळके, कैलास बर्के, रामदास सानप, सूर्यभान पाटील, युवराज शेळके, संचित शेळके, पांडुरंग शेळके, संजय शेळके, दत्ता सानप, सुदाम आव्हाड, राजेंद्र दराडे, भाऊ भाबड, विश्वनाथ शेळके, सागर शेळके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)