नार-पारच्या पाण्यासाठी नांदगावकर एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 16:33 IST2019-02-01T16:33:06+5:302019-02-01T16:33:19+5:30
सर्वपक्षीय सभा : लढा अधिक तीव्र करणार

नार-पारच्या पाण्यासाठी नांदगावकर एकवटले
नांदगाव : नार -पारचे पाणी नांदगांव तालुक्याला मिळालेच पाहिजे, त्यासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार सर्वपक्षीय समितीच्या सभेत करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुहास कांदे यांनी जोपर्यंत डी.पी.आर मध्ये समावेश होत नाही तोपर्यंत पाणी मिळणार नाही. त्यासाठी लवकरच खासदारांचे शिष्टमंडळ घेऊन केंद्राकडे मागणी करणार असल्याचे सांगितले. नार -पार जलहक्क समितीचे प्रमुख आप्पा परदेशी यांनी शेतकरी हितासाठी पाण्याचा लढा सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. शेतकरी जगवायचा आसेल तर नार-पारचे पाणी मिळालेच पाहिजे असा निर्धार यावेळी व्यासपीठावरून सर्वपक्षीय नेत्यांनी केला. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष गुप्ता, स्वाभिमानी संघटनेचे परशराम शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर नगराध्यक्ष राजेश कवडे, बापूसाहेब कवडे, माजी सभापती विलास आहेर, माजी सभापती सुभाष कुटे, जि.प. सदस्य रमेश बोरसे, विजय दराडे, देविदास भोपळे, देविदास खालकर, सुमित गुप्ता, विजय दराडे, वाल्मिक जगताप, कपिल तेलोरे, विशाल वडगुले, विठ्ठल अहिरे, विशाल वडगुले आदीसह विविध पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.