मंत्रीपदासाठी भुसे, झिरवाळ, खोसकरांची नावे चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 20:17 IST2019-12-03T20:15:16+5:302019-12-03T20:17:20+5:30
राज्यात कॉँग्रेस आघाडीचे सरकार असताना राष्टÑवादीकडून छगन भुजबळ यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला एकमेव मंत्रीपद मिळाले होते. भुजबळ यांच्याकडे काही काळ राज्याचे उपमुख्यमंत्रीपद व त्यानंतरच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद होते. त्यानंतर सत्तेवर आलेल्या युती

मंत्रीपदासाठी भुसे, झिरवाळ, खोसकरांची नावे चर्चेत
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : राज्यात महाविकास आघाडीच्या सत्तेतील पहिल्या टप्प्यात राष्टÑवादीकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता शिवसेना व कॉँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रीपदात जिल्ह्यातील कोणत्या आमदाराची वर्णी लागते याकडे साऱ्यांचे लक्ष लागून असून, सेनेकडून पुन्हा एकवार दादा भुसे यांचे तर कॉँग्रेचे एकमेव आमदार हिरामण खोसकर यांच्याही नावाची चर्चा होत आहे. राष्टÑवादीच्या वाट्याला आणखी एक राज्यमंत्रीपद आलेच तर माणिकराव कोकाटे व नरहरी झिरवाळ यांच्या समर्थकांनाही आस लागून आहे.
राज्यात कॉँग्रेस आघाडीचे सरकार असताना राष्टÑवादीकडून छगन भुजबळ यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्याला एकमेव मंत्रीपद मिळाले होते. भुजबळ यांच्याकडे काही काळ राज्याचे उपमुख्यमंत्रीपद व त्यानंतरच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद होते. त्यानंतर सत्तेवर आलेल्या युती सरकारमध्ये नाशिक जिल्ह्याच्या वाट्याला शिवसेनेने एकमेव राज्यमंत्रीपद दादा भुसे यांना देण्यात आले होते. तर जळगावचे गिरीष महाजन यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपविण्यात आले होते. त्यामुळे आजवरच्या सर्वच मंत्रीमंडळात नाशिक जिल्ह्याला चांगले स्थान मिळालेले असल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्टÑवादी व कॉँग्रेस असे तिन्ही पक्ष सहभागी झाले असल्यामुळे तिन्ही पक्षाच्या आमदारांना मंत्रीमंडळात स्थान मिळण्यचाी आशा आहे. सर्वाधिक सहा आमदार राष्टÑवादीचे त्या खालोखाल सेनेचे दोन व एक कॉँग्रेसचा आमदार असून, त्यापैकी पहिल्याच टप्प्यात कॅबिनेटमंत्री म्हणून राष्टÑवादीने छगन भुजबळ यांचा शपथविधी करून घेतला आहे. त्यामुळे आता नंतर कोण याची उत्सूकता लागलेली असून, सेनेकडून दादा भुसे यांचे नाव घेतले जात आहे. भुसे हे चौथ्यांदा निवडून आले असून, गेल्या सरकारमध्ये त्यांनी पाच वर्षे राज्यमंत्रीपदाचा कारभार हाकलल्याचा अनुभव गाठीशी आहे. तर कॉँग्रेसकडून हिरामण खोसकर यांनाही मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. पक्षाचा एकमेव आमदार असल्याने त्यांच्या मंत्रीपदाचा लाभ पक्ष संघटना वाढीसाठी होऊ शकतो असा अंदाज त्यामागे बांधला जात आहे. या उपरही राष्टÑवादीची जिल्ह्यातील ताकद लक्षात घेता, जिल्ह्याच्या वाट्याला राष्टÑवादीकडून आणखी एक राज्यमंत्रीपद मिळाले तर माणिकराव कोकाटे व नरहरी झिरवाळ यांचे नाव पुढे येवू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातही झिरवाळ हे तिसºयांदा निवडून आले आहेत. तर कोकाटे हे पक्षाकडून पहिल्यांदाच विजयी झाले आहेत. दुसरीकडे कोकाटे हे अजित पवार समर्थक म्हणून ओळखले जात असल्याने पवार यांच्यामुळे त्यांनाही संधी मिळू शकते. असे असले तरी, जिल्ह्यात अन्य पक्ष व आमदारांना मंत्रीपदी वर्णी लावायची असल्यास छगन भुजबळ यांचे मत मात्र निर्णायक ठरणार आहे.