शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला नकोशीचे वाचविले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2020 11:26 PM

दिंडोरी : ‘बेटी बढाव बेटी बचाव’चे कितीही नारे देत असले तरी अजूनही स्त्री जन्माला लागलेले ग्रहण काही सुटताना दिसत नाही. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एक अज्ञात निष्ठुर मातेने जन्माला घातलेल्या आपल्या नकोशीला उसाच्या शेताच्या बांधावर टाकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीचे दैव बलवत्तर म्हणून ती वाचली असून तिला ऊसतोड कामगारांनी सुखरूपपणे दवाखान्यात नेत जीवदान दिले आहे.

ठळक मुद्देअवनखेड शिवारात आढळले अर्भक । अभागी चिमुरडीचा काळ आला होता; पण वेळ नाही

लोकमत न्यूज नेटवर्कदिंडोरी : ‘बेटी बढाव बेटी बचाव’चे कितीही नारे देत असले तरी अजूनही स्त्री जन्माला लागलेले ग्रहण काही सुटताना दिसत नाही. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एक अज्ञात निष्ठुर मातेने जन्माला घातलेल्या आपल्या नकोशीला उसाच्या शेताच्या बांधावर टाकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीचे दैव बलवत्तर म्हणून ती वाचली असून तिला ऊसतोड कामगारांनी सुखरूपपणे दवाखान्यात नेत जीवदान दिले आहे.तालुक्यातील अवनखेड शिवारात कादवा नदीलगत अज्ञात इसमाने स्री जातीचे एक दिवसाचे बालक झाडाच्या अडचणीत टाकून त्यावर कागद टाकून पलायन केले. शेजारी सागर जाधव यांची ऊसतोड चालू होती, येथील मजुरांनी बालकाचा रडण्याचा आवाज ऐकला आणि त्या बालकाला बाहेर आणून ऊस मालकाच्या स्वाधीन केले. ही घटना समजताच परिसरातील शेतकरी धावून आले. त्यांनी घटनेची माहिती पोलीसपाटील सतीश निकम व सरपंच नरेंद्र जाधव यांना दिली सरपंच जाधव यांनी रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी आल्यानंतर त्या अर्भकाला तत्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात आणले, अर्भकाची प्रकृती व्यवस्थित असल्याचे समजते.त्यानंतर दिंडोरीचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांनी घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला, पुढील तपास पोलिस हवालदार जाधव ,भोये करत आहे.रविवारी (दि़८) सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा केला जाणार आहे़ त्याच्या पूर्वसंध्येलाच एका नवजात चिमुरडीचा प्राण वाचविण्यात शेतकऱ्यांना यश आले़ या घटनेनंतर पंचक्रोशीत सदर नकोशीची चर्चा सुरू झाली आणि संबंधित मातेबद्दलही संतापाचा सूर उमटला़ चिमुरडीच्या रडण्याच्या आवाजामुळे शेतकऱ्यांना तिचा माग घेता आला़

टॅग्स :Healthआरोग्यCrime Newsगुन्हेगारी