शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे तुकडे होऊन बनणार 'सिंधुदेश'?; लोक रस्त्यावर उतरले, संघर्ष पेटला, ४५ जण अटकेत
2
शेवटचा सत्यशोधक, स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेल्या या माणसाने मग अनेकदा अंधारून येतानाही पाहिले
3
वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक
4
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १० डिसेंबर २०२५: दागिने, वाहन प्राप्ती होणार, वादामुळे हानी होण्याची शक्यता
5
एअर इंडियाला हवेत ‘ए-३२०’साठी वैमानिक; वैमानिकांची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल
6
विधानभवन परिसरात फिरणाऱ्या दलालांवर ‘वॉच’ बिनकामाच्या लोकांना चाप, घेतली जात आहे गुप्त माहिती
7
महापालिकेत युती; वाद विसरून एकोपा, देवेंद्र फडणवीस- एकनाथ शिंदे यांचा बैठकीत निर्णय; मुख्यमंत्र्यांसमोर शिंदे-रवींद्र चव्हाण यांच्यात रुसवेफुगवे
8
‘गारगाई’च्या बांधकामाला १० वर्षांनी मिळाला मुहूर्त; वाढीव पाण्याची गरज प्रकल्पामुळे भागणार
9
अनिल अंबानींचा पुत्र जय अनमोलवर गुन्हा; बँकेला २२८ कोटींना फसवल्याचा आरोप सीबीआयने घेतली झडती
10
महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची संसदेत ग्वाही
11
गुटखा विक्रीप्रकरणी मकोका लावणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा : कायद्यात सुधारणा करणार
12
महिला डाॅक्टरच्या आत्महत्याप्रकरणी ‘एसआयटी’सह न्यायालयीन चौकशी; फलटण येथील प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची माहिती
13
तुकाराम मुंढेंवर कारवाईसाठी सत्ताधारी विधानसभेत आक्रमक; आ. खोपडेंना धमकी देणाऱ्यावर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
14
IND vs SA 1st T20I : पांड्याची 'फिफ्टी' अन् बुमराहची 'सेंच्युरी'; टीम इंडियासमोर द.आफ्रिकेच्या संघानं टेकले गुडघे
15
“संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारा देशात दुसरा CM नाही”; शिंदेंनी केले फडणवीसांचे कौतुक
16
IND vs SA : सूर्यानं दुसऱ्यावरच दाखवला भरवसा; पांड्या म्हणाला, "मला काहीच फरक पडत नाही!"
17
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहनं रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्याविरोधात INDIA आघाडीचे महाभियोग अस्त्र; १२० खासदारांच्या सह्यांसह प्रस्ताव सादर
19
IND vs SA T20I : कटकच्या मैदानात हार्दिक पांड्याची कडक खेळी; सिक्सरच्या 'सेंच्युरी'सह साजरी केली 'फिफ्टी'
20
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
Daily Top 2Weekly Top 5

डिकीमध्ये मृतदेह, पालघरच्या जंगलात विल्हेवाट; नाशिक पोलिसांनी लावला खुनाच्या गुन्ह्याचा छडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 19:27 IST

नाशिकमधील व्यक्तीची हत्या करुन त्याचा मृतदेह जंगलात फेकणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Palghar Crime: मालमत्तेच्या जुन्या वादातून नाशिक येथील एका व्यक्तीच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आरोपींनी त्या व्यक्तीचा मृतदेह पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील वैतरणा धरणाजवळील जंगलात फेकून दिला होता. मुख्य आरोपीसह त्याच्या पाच साथीदारांना पालघरपोलिसांनी अटक केली आहे. हा अत्यंत क्रूर आणि पूर्वनियोजित कट उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

वैतरणा धरणाजवळ आढळला मृतदेह

मोखाडा पोलिसांना १२ जुलै रोजी वैतरणा धरणाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला होता, ज्याचे पाय वेलीने बांधलेले होते. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली. तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने, तपास पथकांनी तब्बल एका महिन्यानंतर, १३ ऑगस्ट रोजी, मृताची ओळख पटवली. मृत व्यक्ती इगतपुरी येथील रहिवासी शरद बोडके (वय ३१) असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांनी तातडीने खुनाचा आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला.

मालमत्तेचा वाद, कुटुंबीयांना मारहाण

स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात हा मालमत्तेच्या वादातून झालेला खून असल्याचे उघड झाले आहे. मृत शरद बोडके याचा मुख्य आरोपी संतोष धात्रक याच्यासोबत मालमत्तेवरून जुना वाद होता.

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "मृत बोडके हा वारंवार आरोपी संतोषच्या कुटुंबीयांना त्रास देत असे आणि दादागिरी करत असे. एकदा वादातून त्याने आरोपीच्या आई-वडिलांना मारहाण केली होती आणि आरोपीच्या मामाचा पायही फ्रॅक्चर केला होता."

नाशिकमध्ये हत्या, पालघरमध्ये विल्हेवाट

या त्रासाला कंटाळून आणि कुटुंबीयांवरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मुख्य आरोपी संतोष धात्रक याने आपल्या चार मित्रांसोबत शरद बोडकेला संपवण्याचा कट रचला. योजनेनुसार, संतोषने बोडकेला नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील एका निर्जनस्थळी पार्टीसाठी बोलावले. तिथे त्यांनी एकत्र दारू प्यायली. नशेत असताना या सर्वांनी बोडकेला मारहाण केली आणि नंतर त्याचा गळा दाबून खून केला. हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह गाडीच्या डिकीत लपवला आणि नाशिकहून सुमारे १५० किलोमीटरचा प्रवास करून तो पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील वैतरणा धरणाजवळील जंगलात फेकून दिला.

पाच आरोपींना अटक, कार जप्त

पालघर पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी संतोष धात्रक (३६) आणि त्याचे मित्र शिवराम वाघ (२९), गोकुळ बेंडकोळी (२९), गणेश बेंडकोळी (२२), आणि संजय पोटकुळे (३०) या सर्व नाशिक रहिवासी असलेल्या पाचही आरोपींना अटक केली आहे. आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, पोलिसांनी हत्येनंतर मृतदेह फेकण्यासाठी वापरलेली कारही जप्त केली आहे. कुटुंबावरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केलेला हा थंड डोक्याने केलेला खून आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची क्रूर पद्धत पाहून पोलीसही चक्रावले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik murder solved: Body in car, dumped in Palghar forest.

Web Summary : Nashik man murdered over property dispute. Body dumped in Palghar forest. Five arrested for the crime, car seized. Revenge motive suspected.
टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीpalgharपालघरPoliceपोलिस