Mukesh Sarwan visits Yeola Municipality | मुकेश सारवान यांची येवला नगरपालिकेस भेट
येवला पालिका भेटीत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान. समवेत मुख्याधिकारी संगीता नांदुरकर, स्वच्छता निरीक्षक घनशाम उमरे व पालिका कर्मचारी.

येवला : महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी शनिवारी येवले नगर परिषदेस भेट दिली. याप्रसंगी झालेल्या कार्यक्र मादरम्यान मुकेश सारवान यांनी नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या समस्या समजून घेत त्यावर तातडीने मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
येवले नगरपालिका सभागृहात झालेल्या सभेस सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर सभेत बोलताना त्यांनी सफाई कामगारांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य घरकुल योजनेच्या प्रलंबित प्रश्नाबाबत व्यक्तिगत लक्ष केंद्रित करून त्वरित मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सफाई कामगारांच्या योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून त्याचा लाभ सफाई कामगारांंना देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे मुख्याधिकारी संगीता नांदुरकर व नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांनी सांगितले. कार्यक्र मात येवले म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने सारवान यांचा सत्कार श्याम लोंढे, प्रकाश सातभाई, सोनी खलसे यांनी केला.

Web Title: Mukesh Sarwan visits Yeola Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.