शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाला मुहूर्त लागेना

By admin | Updated: August 1, 2014 01:10 IST

अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाला मुहूर्त लागेना

नाशिक : साहित्य, कला, राजकारण आणि समाजसुधारणा अशा चौफेर क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे महाराष्ट्रात उचित स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र या घोषणेला आता एक वर्ष उलटून गेले तरीही अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही. इतकेच नव्हे तर पुणे येथील नाट्यगृहाचे काम अपूर्णावस्थेत आहे. येत्या १ आॅगस्टला जयंतीनिमित्त तरी या कामाला मुहूर्त लागावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सुमारे नऊ दशकांपूर्वी तत्कालीन समाजजीवनात अत्यंत कनिष्ठ आणि मागास मानल्या जाणाऱ्या मातंग समाजात जन्मलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी कलेचा झेंडा राज्य आणि देशातच नव्हे, तर परदेशात म्हणजे रशियात जाऊन फडकविला. सुमारे सहा डझन (७२) पुस्तके लिहिणाऱ्या अण्णा भाऊंनी डाव्या आघाड्यांच्या कामगार चळवळीत मोठे योगदान दिले. किंबहुना कार्ल मार्क्सच्या विचारांचे ते खंदे पाईक होते. ‘पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर उभी नसून कामगारांच्या हातावर आणि शेतकरी, शेतमजूर कष्टकरी यांच्या श्रमावर उभी आहे.’ असे विचार मांडणाऱ्या अण्णा भाऊंची महाराष्ट्राने उपेक्षाच केली. केवळ जिवंतपणीच नव्हे, तर मृत्यूनंतरही त्यांच्या कार्याची दखल कोणाला घ्यावीशी वाटली नाही, अशी खंत लोकसाहित्याचे अभ्यासक व शाहिरांनी व्यक्त केली.अनेक वाद्य वाजविण्यात अवगत असलेल्या भाऊंनी लोकनाट्य या लोककलेला समाजप्रबोधनाचे साधन बनविले. त्यांच्या कांदबऱ्यांवर अनेक चित्रपटही निघाले. नुकतीच दि. १८ जुलैला त्यांची पुण्यतिथी होती. या दिवशी नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद आदि शहरात त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून फक्त फोटो काढून घेण्याचे कार्यक्रम झाले. मागील वर्षी याच काळात अण्णा भाऊ साठे यांचे जन्मगाव वाटेगाव येथे उचित स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मागील वर्षी दि. १ आॅगस्ट रोजी अण्णा भाऊ साठे जयंती कार्यक्रमप्रसंगी केली होती. परंतु त्या घोषणेनंतर पुढे काहीही झाले नाही. इतकेच नव्हे, तर पुणे येथे बिबवेवाडी परिसरात १९ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेले अण्णा भाऊ साठे नावाचे नाट्यगृहाचे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. याप्रश्नी लक्ष घालावे, अशी विनंती मातंग समाजातील कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींकडे केली होती; परंतु या मागणीची अद्यापही दखल घेतली गेली नाही, अशी खंत समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.