शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या बदल्यांना लागला मुहूर्त

By admin | Updated: May 18, 2014 00:27 IST

रविवारी आरोग्य, तर सोमवारी बांधकामच्या बदल्या

रविवारी आरोग्य, तर सोमवारी बांधकामच्या बदल्यानाशिक : जिल्हा परिषदेच्या कर्मचारी बदल्यांना मुहूर्त सापडला असून, शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार शनिवारी (दि.१७) सामान्य प्रशासन, कृषी व अर्थ विभागातील कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या झाल्या. सर्वाधिक बदल्या कनिष्ठ सहायक संवर्गातील कर्मचार्‍यांच्या झाल्या.सामान्य प्रशासन विभागातील एकूण ३० प्रशासकीय तर १० कर्मचार्‍यांच्या विनंती बदल्या झाल्या. अर्थ विभागातील कर्मचार्‍यांच्या रात्री उशिरापर्यंत बदल्यांची कार्यवाही सुरू होते. सामान्य प्रशासन विभागातील कक्ष अधिकारी संवर्गात दोन प्रशासकीय बदल्या करावयाच्या होत्या; मात्र जागा रिक्त नसल्याचे कारण देत या बदल्या टाळण्यात आल्या. कार्यालयीन अधीक्षक संवर्गातील प्रशासकीय स्वरूपाच्या दोन बदल्या करावयाच्या असताना प्रत्यक्षात तीन करण्यात आल्या तर विनंती स्वरूपाच्या तीन बदल्यांची कार्यवाही करण्यात आली. कनिष्ठ सहायक संवर्गात २१ प्रशासकीय तर पाच विनंती स्वरूपाच्या तसेच वरिष्ठ सहायक संवर्गातून १४ प्रशासकीय तर २ विनंती स्वरूपातील बदल्यांची कार्यवाही करण्यात आली. कृषी विभागातील तीन कृषी अधिकार्‍यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या, तर विस्तार अधिकार्‍यांच्या दोन प्रशासकीय व एक विनंती अशा तीन बदल्यांची कार्यवाही करण्यात आली. या कृषी विस्तार अधिकार्‍यांना पदोन्नतीने रिक्त झालेल्या जागी नियुक्त्या देण्यात आल्या. रविवारी (दि.१८) आरोग्य विभागाच्या तर सोमवारी (दि.१९) लघुपाटबंधारे, बांधकाम व पशुसंवर्धन विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहेत. बदल्यांची कार्यवाही मुख्यालयातील रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आली. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोेराडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)