शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

करदात्याच्या दारापुढे हलगीचा सूर

By admin | Updated: March 23, 2017 21:43 IST

येवला :शहरातील थकीत करदात्याच्या दारापुढे जाऊन येवल्याचा पारंपरिक उत्सवासाठी वापरला जाणारा हलगीचा सूर आता करदात्याला कर भरण्याचे आवाहन करण्यासाठी वापरला जात आहे.

 येवला : येवला नगरपालिकेने शहरात सक्त करवसुलीचे धोरण अवलंबले असून या वसुलीचा भाग म्हणून शहरातील थकीत करदात्याच्या दारापुढे जाऊन येवल्याचा पारंपरिक उत्सवासाठी वापरला जाणारा हलगीचा सूर आता करदात्याला कर भरण्याचे आवाहन करण्यासाठी वापरला जात आहे. महाराष्ट्र शासनाने यंदा १०० टक्के करवसुलीचे उद्दिष्ट सर्व नगरपालिकांना दिल्याने पालिका बेधडक कारवाई करीत आहे. जेवढी मिळेल तेवढी रक्कम पदारात पाडून उरलेली रक्कम दि.३० मार्चच्या आत भरण्याचे आवाहन या करवसुली पथकाकडून केले जात आहे. नळ कनेक्शनधारक ग्राहकाकडून थकलेल्या कराअभावी त्यांचे नळ कनेक्शन कट करण्याचे धोरण पालिकेने अवलंबले आहे. या मोहिमेत उपमुख्याधिकारी आर. आय. शेख, भांडारपाल विजय शिंदे, संगणक अभियंता अभितोष सांगळे, स्वच्छता अभियंता सत्यवान गायकवाड, अशोक कोकाटे, सुनील जाधव, विरेंद्र परदेशी, रवींद्र कदम, घनश्याम उंबरे, उदय परदेशी, अरुण चव्हाण आदि कर्मचारी सहभागी झाले होते. १५ ते १८ मार्च या कालावधीत नगरपालिकेने जुन्या कार्यालयात विशेष करवसुली शिबिराचे आयोजन केले होते. त्यास शहरातील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कालावधी कमी असल्याने सुटीच्या दिवशीदेखील करवसुली करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्याकडे असलेली कराची रक्कम तत्काळ भरावी, असे आवाहन मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे. अशा प्रकारची सक्त वसुलीची मोहीम शहरात चालू असून थकबाकी असलेल्या नागरिकांचे नळ कनेक्शन तोडले जात आहे व थकीत घरपट्टी असलेल्या नागरिकांवर मालमत्ता जप्तीसारखे निर्णय घेतले जातील, असे नगरपालिकेने स्पष्ट केले आहे. असे कटू प्रसंग टाळण्यासाठी व शहराच्या विकासास हातभार लावण्यासाठी नागरिकांनी कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)