Mourning on the police force: Corona took the victim of the police again | कोरोनाने घेतला पुन्हा पोलिसाचा बळी

कोरोनाने घेतला पुन्हा पोलिसाचा बळी

ठळक मुद्देफणफणून ताप चढला आणि श्वासोच्छवासाला त्रास ग्रामिण पोलीस दलातील दुसऱ्या कर्मचा-याचा बळी

नाशिक : दिवस-रात्र एक करून कोरोनाशी थेट मुकाबला करणाऱ्या पोलीस दलावर पुन्हा शोककळा पसरली. नाशिक ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार यांची अखेर कोरोनासोबतची झुंज सोमवारी (दि.२५) पहाटे संपली. त्यांच्या रूपाने कोरोनाने ग्रामिण पोलीस दलातील दुसऱ्या कर्मचा-याचा बळी घेतला. याप्रकरणी जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनीही शोक व्यक्त करत आपल्या कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचा-यास आदरांजली वाहिली.
मालेगाव येथे पोलीस बंदोबस्तावर असलेले यांना बंदोबस्ताचा कालावधी पुर्ण होताच आठवडाभर क्वारंटाइन करण्यात आले. दरम्यान, त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाला होता. त्यानंतर नाशिकमधील राहत्या घरी मागील आठवड्यात ते दाखल झाले; मात्र चार दिवसांपुर्वी पुन्हा त्यांना फणफणून ताप चढला आणि श्वासोच्छवासाला त्रास जाणवू लागल्याने त्यांना मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे पुन्हा त्यांच्या थुंकीचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले असता तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर  यांना उपचारासाठी मविप्रच्या रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि सोमवारी पहाटे त्यांचे रुग्णालयात दुर्दैवी निधन झाले.  त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
 

Web Title: Mourning on the police force: Corona took the victim of the police again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.