शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

लाखाहून अधिक मतदार बजावणार हक्क

By admin | Updated: February 21, 2017 01:08 IST

पश्चिम विभाग : २० संवेदनशीलसह १४ क्रिटिकल केंद्रांवर लक्ष

नाशिक : पश्चिम विभागात निवडणूक कार्यालयाने ३४ मतदान केंदे्र संवेदनशील असल्याचे निर्देशित केले असून, यात प्रभाग क्रमांक २४ मधील १४ क्रिटिकल मतदान केंद्रांचाही समावेश आहे. या संवेदनशील व क्रिटिकल मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाचे विशेष लक्ष असून, आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. विभागातील ७, १२ व २४ या तीन प्रभागांमधून एकूण एक लाख नऊ हजार ९०२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.  पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक ७, १२ व २४ साठी महापालिका निवडणूक मतदानप्रक्रियेची तयारी पूर्ण झाली आहे. विभागातील तिन्ही प्रभागांच्या १४२ मतदान केंद्रांवर एकू ण एक लाख नऊ हजार ९०२ मतदार मतदानाचा हक्क बजावण्याची संधी आहे. यात प्रभाग क्रमांक ७ मध्ये १८ हजार ७७४ महिला व १७ हजार ३७९ पुरुषांसह ३६ हजार १५३ मतदार असून, प्रभाग १२ मध्ये १८,३८० महिला व १७,४६२ पुरुष मतदार आहेत. प्रभाग २४ मध्ये १९,९८४ महिला व १८,१२३ पुरुष मतदार असून, पश्चिम विभागातील एकूण १४२ केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी निवडणूक कार्यालयाला एकूण ३१२ मतदान यंत्रे व १५७ नियंत्रण यंत्रे प्राप्त झाली आहेत. यासर्व यंत्रांची अंतिम तपासणी पूर्ण झाली असून, मतदान यंत्र सीलबंद करून मतदान केंद्रांवर पोहोचविण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)