शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

कांदा अनुदानासाठी आणखी पंधरा दिवस मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 19:21 IST

जिल्ह्यात यंदा उन्हाळ कांद्याचे भाव सप्टेंबर अखेरपासूनच घसरण्यास सुरुवात झाली. आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत कांदा अक्षरश: मातीमोल भावात शेतक-यांना विक्री करावा लागला. अनेक शेतक-यांना कांद्याच्या वाहतुकीचा खर्चदेखील निघाला नाही

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा : ३१ डिसेंबरपर्यंत विक्रीची मुभा

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कांदा दरात झालेली घसरण व त्यातून गावोगावी सरकारविरुद्ध शेतक-यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतक-यांना क्विंटलमागे दोनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेत त्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत कांदाविक्री केलेल्या शेतक-यांनाच पात्र ठरविले. परंतु आता त्या मुदतीत आणखी पंधरा दिवसांनी वाढ करण्यात आली असून, नवीन निर्णयानुसार ३१ डिसेंबरपर्यंत कांदाविक्री केलेल्या शेतक-यांनाही सरकारच्या या मदतीचा लाभ दिला जाणार आहे.

जिल्ह्यात यंदा उन्हाळ कांद्याचे भाव सप्टेंबर अखेरपासूनच घसरण्यास सुरुवात झाली. आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत कांदा अक्षरश: मातीमोल भावात शेतक-यांना विक्री करावा लागला. अनेक शेतक-यांना कांद्याच्या वाहतुकीचा खर्चदेखील निघाला नाही, तर अनेकांनी चाळीतच कांदा ठेवणे पसंत केले. त्यामुळे कांदा उत्पादक शेतक-यांमध्ये सरकारविरुद्ध असंतोष निर्माण होऊन कांदा विक्रीचे पैसे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना मनिआॅर्डरने पाठवून राग शमविण्याचा प्रयत्न केला. गावोगावी रस्त्यावर कांदा ओतून आंदोलने होत असल्याने आगामी निवडणूक लक्षात घेता, सरकारने शेतकºयांना आपलेसे करण्यासाठी १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळात कांदाविक्री केलेल्या शेतक-यांना क्विंटलमागे दोनशे रुपये अनुदान देण्याचा व दोनशे क्विंटलपर्यंत विक्री केलेल्या कांद्यालाच ते देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शेतक-यांकडून कांदा विक्रीच्या पावत्या, पीकपेरा, सातबारा उतारा व बॅँकेचे खाते क्रमांकाची माहिती सहकार विभागाला सादर करण्यासाठी २५ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे ७२ हजार शेतक-यांनी आपली माहिती सहकार विभागाला सादर केली असून, शेतक-यांनी सादर केलेल्या माहितीची छाननी केली जात असतानाच, गुरुवारी राज्य सरकारने पुन्हा शेतक-यांना दिलासा देण्यासाठी १५ डिसेंबरऐवजी ३१ डिसेंबरपर्यंत कांदाविक्री केलेल्या शेतक-यांनाही अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. १५ डिसेंबरनंतर कांदाविक्री केलेल्या शेतक-यांनाही आता याचा लाभ मिळणार आहे.

चौकट===सरकारने मुदतवाढ दिली असली तरी, १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळात पंधरा दिवस जिल्ह्यातील बाजार समित्या दिवाळी सणामुळे बंद होत्या. त्यामुळे शेतक-यांसाठी कांदा विक्रीसाठी कमी कालावधी मिळाला. मुळात आॅक्टोबर महिन्यापासून सुरू झालेली कांदा घसरण जानेवारीपर्यंत कायम असून, सरकारचा विशिष्ट कालावधीसाठी अनुदान देण्याचा निर्णय म्हणजे शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार आहे.- राजेंद्र डोखळे, शेतकरी नेते

टॅग्स :onionकांदाNashikनाशिकagricultureशेती