प्रदर्शनात ५०हून अधिक प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 00:31 IST2019-02-09T00:11:14+5:302019-02-09T00:31:47+5:30
पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये भरविण्यात आलेल्या दोनदिवसीय आयओटी इंटरनेट आॅफ थिंग्स प्रदर्शनास शहर व परिसरातील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

प्रदर्शनात ५०हून अधिक प्रकल्प
नाशिकरोड : पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये भरविण्यात आलेल्या दोनदिवसीय आयओटी इंटरनेट आॅफ थिंग्स प्रदर्शनास शहर व परिसरातील सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
अंधांसाठी काठी, शेतीसाठी पाणीपुरवठा, बॉडी मास इंडेक्स मशीन, लोकेशन ट्रेस, स्मार्ट क्लास रूम, स्मार्ट अल्कोहोल डिटेक्टर, सेफ्टी कीट फॉर गर्ल्स, बजर सिस्टीम, रेल्वे अपघात पूर्व सूचना, स्वयंचलित रेल्वे गेट, अशा विविध ५० हून अधिक प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले आहेत.