विवाहित शिक्षिकेचा शिक्षकाकडून विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 17:50 IST2019-02-07T17:47:00+5:302019-02-07T17:50:41+5:30
अश्लील छायाचित्र व चित्रफिती पाठवून लैंगिक संबंधाची मागणी केल्याप्रकरणी पिडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन कुशवाहविरुध्द विनयभंगाचा गुन्हा

विवाहित शिक्षिकेचा शिक्षकाकडून विनयभंग
इंदिरानगर : ओळखीचा गैरफायदा घेत एका संशयित शिक्षकाने विवाहिता शिक्षिकेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. गंगापूररोडवरील एका खासगी शाळेत नोकरीला असलेल्या व इंदिरानगरमधील रहिवासी असलेल्या पिडित विवाहितेचा संशयित अजितकुमार कुशवाह (रा.वडनेर गेट) याने अश्लील छायाचित्र व चित्रफिती पाठवून लैंगिक संबंधाची मागणी केल्याप्रकरणी पिडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन कुशवाहविरुध्द विनयभंगाचा गुन्हा इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुशवाह व पिडित विवाहिता काही वर्षांपुर्वी एकाच शाळेत नोकरीला होते. यावेळी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत पिडित शिक्षिके ला कुशवाह वारंवार फोन करुन त्रास देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिडितेचा विवाहितेचा २०१७ साली विवाह झाला. त्यानंतर गेल्या वर्षापासून पुन्हा अजितकुमार याने पिडितेसोबत संपर्क साधत ‘तू नवर्यासोबत बोलू नको, त्याच्या सोबत राहू नको तू तर त्याच्यासोबत राहिली तर मी तुला जगू देणार नाही, तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल’ असे धमकावत शरीरसंंबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव टाकू लागला. दरम्यान, संशयित कुशवाह याने अश्लील चित्रफिती, छायाचित्रे पिडितेच्या व्हॉटसअॅपवर पाठवून विनयभंग केल्याचा गुन्हा पोलिसांनी फिर्यादी पिडित शिक्षिकेने दिलेल्या फिर्यादीवरून दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास उपनिरिक्षक बेल्हेकर करीत आहेत.